मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच होणार (फोटो- istophoto)
रत्नगिरी: मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा दुवा आहे. कोकणात जाणाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. मात्र गेले कित्येक वर्षे हा मुंबई गोवा महामार्ग चौपदीरकणाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी कामे अजूनही रखडलेली आहेत. देशात सर्वत्र मोठे मोठे महामार्ग वेळेत बांधून तयार होत आहेत. मात्र गेले १४ ते १५ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरुच आहे. मात्र आता कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकदारांना डेडलाईन दिली आहे. गडकरी यांनी ठेकेदारांची कानउघाडणी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे सुरु आहे. जवळपास १४ वर्षे या महामार्गाचे काम सुरु आहे. यामध्ये सर्वांत जास्त रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली आणि संगमेश्वर या ठिकाणी बाकी आहे. आरवली ते काटे तर कांटे वाकेड मार्गाचे काम पूर्ण झालेलं नाही आहे.
नितीन गडकरी यांनी हायवेचे काम करणाऱ्या ठेकेदारांना चांगलेच झापले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होतोय मृत्यूचा सापळा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. या महामार्गावरील ओळखल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात शनिवारी सकाळी एक थरारक अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ज्यात चालक आणि त्याचा एक साथीदार जखमी झाले. चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती, मात्र स्थानिक तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
Ratnagiri News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होतोय मृत्यूचा सापळा ; भोस्ते घाटात भीषण अपघात
शनिवारी सकाळी ट्रक क्र एमएच ०१ इ डब्ल्यू ०६७५ भोस्ते घाटातून जात असताना हा अपघात झाल्याच समोर आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच ‘मदत ग्रुप खेड’चे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत विनायक कदम आणि अक्षय भोसले यांनीही मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.
ट्रक उलटल्याने चालक मोहम्मद शाकीर अब्दुल हमीद शेख (वय २३, रा. शांतीनगर, भिवंडी) हा केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. यावेळी मदतकार्य करणाऱ्यांनी एका अनोख्या युक्तीचा वापर केला. दुसऱ्या एका ट्रकच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रकला दोरी बांधून त्याला हळूवारपणे सरळ करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.