Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका; अतुल लोंढे यांची मागणी

ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 17, 2023 | 07:39 AM
ठाण्यात मुलीला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला बेड्या ठोका; अतुल लोंढे यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : ठाण्यात एका मुलीच्या अंगावर गाडी घालून तीला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी गुन्हेगाराला मात्र अजून अटक करण्यात आलेली आहे. यात काहीतरी गौडबंगाल असून संशयाला बळ देणारे आहे. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम व सक्षम नेते आहेत असे सांगितले जाते मग एवढे कार्यक्षम नेते गृहमंत्री पदावर असतानाही ठाण्यासारख्या शहरात मुलीला चिरडण्याचा गंभीर प्रकार होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीवर व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गृहविभाग काय करत आहे ? आणि ठाणे प्रकरणातील गुन्हेगाराला अटक कधी होणार? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील घटनेवर प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भाजपाने एक नवीन प्रशासकीय पॅटर्न आणला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा महत्वाच्या पदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत यातून या अधिकाऱ्यांची मुलेही निर्ढावत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात एका मुलीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला त्यातील आरोपीचे नाव अश्वजित गायकवाड असून भारतीय जनता युवा मोर्चाचा तो नेता आहे तसेच MSRDC चे वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांचा तो मुलगा आहे. त्या मुलीशी अश्वजितचे प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत आहे. वडिल प्रशासनात उच्च अधिकारी असल्यानेच अश्विजित गायकवाडला अटक होत नाही का असा प्रश्न लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाशी संबंधित लोकांमध्ये महिला अत्याचार तसेच बलात्कारांसारख्ये गंभीर गुन्हे करण्याची हिम्मत येते कोठून? आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे का? कायदा आपले काही बिघडवू शकत नाही? ‘भाजपा है तो सब मुमकीन है’. अशी भावना त्यांच्यात वाढीस लागल्याचे दिसत आहे. मग ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ चे नारे कशाला देता? महिला सुरक्षेचा ढोल कशाला पिटता ? ठाणे प्रकरणातील गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला बेड्या ठोका व पीडित मुलीला न्याय द्या, असे अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Chain the criminal who tried to crush a girl under a car in thane demand of atul londhe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2023 | 07:39 AM

Topics:  

  • Atul Londhe
  • cmomaharashtra
  • Congress
  • DCM Devedra Fadnavis
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.