फोटो सौजन्य- pinterest
उत्सवात लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. गेल्या वर्षी उत्सवात १०० हून अधिक पथकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या वर्षांच्या यशानंतर यंदा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या उत्सवात जन्माष्टमीच्या सोहळ्यावेळी रेमंड संकुलातील बच्चे कंपनीकडून हंडी फोडली जाईल. तसेच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून, स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे.
भव्य दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा ११ थर रचणाऱ्या पथकाला २१ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल.
तर सर्वप्रथम १० थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल.
सर्वप्रथम नऊ थर रचणाऱ्या पथकाला २ लाख रुपये दिले जातील. त्यानंतर ९ थर लावणाऱ्या गोविंदांना १ लाख रुपये बक्षीस दिले जाईल.
८ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार रुपये, सात थरांसाठी १० हजार रुपये, सहा थरांसाठी ५ हजार, ५ थरांसाठी ३ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल.
यंदा रेमंड दहीहंडीत एकही गोविंदा जखमी होऊ नये, यासाठी सुरक्षा टीम सज्ज राहील. त्याचबरोबर दुर्घटनेच्यावेळी तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज राहणार आहे.
या उत्सवाच्या यशस्विततेसाठी अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्याबरोबरच मंडळाचे खजिनदार परशुराम आंब्रे, राहुल सादरे, राजेंद्र कुंभार, मुकुंद डोके, संकेत कदम, विशाल खसे, श्रीकांत भागवत, शैलेश अहिरराव, निबेन चंद्रन, चिंतन पटेल, वैभव गोवेकर, प्रशांत केकाणे, राजेश सावंत, अमेय जाधव, विराज दोशी, प्रशांत यादव, संजय लोणे, संदिप खांबे, सुनील जंगम, अंकुश माने, दिलीपराज पवार, धीरज देशमुख, स्वप्नील माळी, जितेंद्र तारमाळे, रुक्मिणी त्रिवेदी, संजय सुर्वे, अतुल गुप्ता, निखिल केरकर, सागर कड, महेश कश्यत, अमरीश कल्लूर, भास्कर ऐनकर, विजय नागावकर, किशोर मोरे, भरत खरिवले, गगन टाक, राजेश प्रजापती, विश्वास खेतले, अभिजित साजेकर, आशिष कदम आदी कार्य करीत आहेत. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून गोंविदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






