Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर प्रतिसाद; मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

Chala Shalet Jauya Campaign Dadaji Bhuse Konkan School Inspection: ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील विविध शाळांना भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 10:06 PM
Chala Shalet Jauya Campaign D

Chala Shalet Jauya Campaign D

Follow Us
Follow Us:
  • ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला वेग
  • विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्वच्छता अन् सुविधांची तपासणी
  • शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा
राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया तसेच विविध शासकीय शैक्षणिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पालक अधिकारी आणि जिल्हा नोडल अधिकारी यांच्या प्रत्यक्ष शाळा भेटींमुळे शालेय प्रशासनातील सकारात्मक बाबी, अडचणी आणि आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

मंत्री दादा भुसे यांनी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडुरंगशेठ पडते, पडतेवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खारेपाटण क्रमांक १, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, पानवल, होरंबेवाडी आणि आदिवासीवाडी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा झरेवाडी, येथे भेट देऊन शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. तसेच, या भेटींदरम्यान विद्यार्थ्यांकडून त्यांचे वाचन, लेखन व अध्ययन कौशल्यांचा आढावा घेण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीदवाक्य केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना, सामाजिक मूल्ये आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे मंत्री भुसे यांनी यावेळी नमूद केले. मंत्री भुसे यांच्या निर्देशांनुसार शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यासाठी ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विविध जिल्ह्यांकरिता शालेय शिक्षण विभागातील सहसंचालक व उपसंचालक यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, वाचन व लेखन कौशल्ये, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्थिती, वर्गखोल्या, शाळा परिसराची स्वच्छता, क्रीडांगण, संरक्षक भिंत, वीजपुरवठा, आवश्यक फर्निचर, डिजिटल व ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहाराची गुणवत्ता व वितरण यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच उपलब्ध सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांचाही आढावा घेण्यात येत आहे.

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासन थेट शाळेपर्यंत पोहोचत असून, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित शालेय वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित केल्या जात आहेत.

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी

Web Title: Chala shalet jauya campaign dadaji bhuse konkan school visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Kokan News
  • Maharashtra Schools
  • Marathi Schools

संबंधित बातम्या

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा
1

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Konkan News: ‘सह्याद्री वाचवायचा असेल तर…’; ‘’कोंकणी रानमाणसा’ने सांगितला संवर्धनाचा नवा मंत्र
2

Konkan News: ‘सह्याद्री वाचवायचा असेल तर…’; ‘’कोंकणी रानमाणसा’ने सांगितला संवर्धनाचा नवा मंत्र

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश
3

Nashik News : नाशिकमधील बंद मनपा शाळा पुन्हा सुरू होणार; दादा भुसे यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार
4

Fresh And Nutritious Meals : विद्यार्थ्यांना ताजा पोषण आहार वेळेत मिळावा; जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार देणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.