Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया; संजय राऊतांवर साधला निशाणा

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी. जादूची कांडी शोधावी, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राऊत यांना लगावला .

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2025 | 04:33 PM
दिल्लीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया; संजय राऊतांवर साधला निशाणा

दिल्लीतील विजयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया; संजय राऊतांवर साधला निशाणा

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : खासदार संजय राऊत महान नेते आहेत. काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेना उबाठानं आपला सपोर्ट केला आहे. येथेच मोठी ठिणगी पडली आहे. आता त्या आघाडीतून इतर बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसच बाहेर पडेल. जादूच्या कांडीनं रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी. जादूची कांडी शोधावी, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राऊत यांना लगावला .

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा अजूनही करिष्मा कायम असल्याचे सांगितले. तर दुसरीकडं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकादेखील केली.

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढली असती तर निकाल वेगळा आला असता, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाची राजधानी दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास वाढल्याचं उदाहरण आहे. भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यास लोकांचा आणि राज्याचा विकास होणार आहे. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान मोदींचा करिष्मा संपल्याचं विरोधकांना वाटलं. मात्र, मोदींचा करिष्मा संपला नाही. संपणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत खोटं नरेटीव्ह सेट करण्यात आलं. मात्र, त्यानंतर लोकांना कळलं की गडबड झाली. विधानसभेला त्यांनी करेक्ट केलं. यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणात एकतर्फी यश मिळालेलं आहे. दिल्ली मध्येदेखील हीच परिस्थिती आहे. दिल्ली विधानसभेत सरकार येत आहे. असं पाटील म्हणाले.

५ लाख लाडक्या बहिणी अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा २ कोटी ४२ लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. मग, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचं की अर्धा भरलेला आहे, असं म्हणायचं? कार असलेले, इन्कम टॅक्स भरलेला किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेल्या ५ लाख महिलांना वगळण्यात आले. यामध्ये इतकं आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही, अशी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

विरुद्ध निकाल लागला की घोटाळा

राहुल गांधी यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषेदवरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेला दावा फोल ठरला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला निवडणूक आयोग उत्तर देईल. एकसारखी कॅसेट चालवणं काँग्रेसनं आता बंद करावं. कर्नाटकात यश मिळालं की ईव्हीएम चांगलं असतं. महाराष्ट्रात विरुद्ध निकाल लागला की घोटाळा झाला म्हणतात.

Web Title: Chandrakant patil has reacted after bjps victory in delhi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • Delhi Election Result
  • kolhapur news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
4

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.