
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “चंद्रपूरमध्ये कोणताही वाद नाही. निश्चित स्वरूपात समन्वय स्थापित होईल, काल एका नेत्याने दस्तऐवज घेऊन गट नोंदणी केली ही माहिती खरी आहे, परंतु चंद्रपूर मध्ये काँग्रेसचाच महापौर पाहायला मिळेल, आमचे दोन्ही नेते सामूहिक रित्या या महानगरपालिकेचे नेतृत्व करतील. आम्ही अजून सात आकड्यापासून मागे आहोत, त्यामुळे आम्ही इतर मित्र पक्षाला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. परभणीच्या धरतीवर ठाकरेच्या शिवसेनेने आम्हाला चंद्रपूरमध्ये मतदान करावं यासाठी चर्चा सुरू आहेत.
PMC Mayoral Election: महापौर-उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर; पुण्याला कधी मिळणार
रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राचे प्रभारी असल्याने ते संपर्कात असतात, आढावा घेत असतात. आवश्यक त्याठिकाणी ते सूचना करत असतात, असंही सपकाळ यांनी नमुद केलं.
दरम्यान यावेळी सपकाळ यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरही भाष्य केलं. “बदलापूरची घटना ही सत्ताधार्यांना जोरदार चपराक आहे, पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणे, त्यातून अत्याचार गुंडागर्दी किती वाढत चालली, देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता तरी महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा. बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवक घेत असताना ज्याच्यावर अत्याचार आणि पोस्कोचे आरोप आहेत अशा व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक करत असाल तर तुम्ही काय संदेश देत आहात.” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केले. (Chandrapur Municipal Election 2026)
शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा; शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार
राज्यात 24 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणीचा लाभ थांबल्याच्या मुद्द्यावरून सपकाळ यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ” राज्य सरकारने जाणून बुजून लाभार्थी कमी करण्याचे अनुषंगाने द्विअर्थी शब्द वापरले आहेत, हा सरकारचा पूर्व नियोजित कट आहे.
मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्याचे कारण काय ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक आदान प्रधानाचा विषय असेल तर निश्चित चांगला म्हणता येईल मात्र तसं न करता केवळ संप्रदायवाद निर्माण करण्याच्य दृष्टीने जर हा निर्णय घेतलेला आहे, असा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला. तसेच, बिहार निवडणुकीच्या तोंडावर जर आम्ही पटनामध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, आणि मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार असल्याचे म्हटले, तर याला संस्कृतिक आदान प्रदान म्हणतात.