Chandrapur Municipal corporation Election 2026:- चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी विकासाचे गणित मांडत 66 पैकी भाजपचे 36 नगरसेवक निवडून आल्याने स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेना 2 पैकी एक भाजपात दाखल झाला आहे. काँग्रेस 12, बसपा 8, राष्ट्रवादी 2, मनसे 2, अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल होते. मागील अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने विकासाची गती कमी झाली. त्यातच महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झाल्याने विरोधी पक्ष फ्रंटफूटवर होता. असे असले तरी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचा फायदा या निवडणुकीत भाजप घेऊ शकतो.






