Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ३५३ लाखांचा रस्ता पुन्हा खड्ड्यात! बामणी-कोठारी मार्गावरील निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त

लाखो रुपये खर्चूनही रस्ता खड्डेमय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 17, 2026 | 02:24 PM
Chandrapur News: ३५३ लाखांचा रस्ता पुन्हा खड्ड्यात! बामणी-कोठारी मार्गावरील निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त

Chandrapur News: ३५३ लाखांचा रस्ता पुन्हा खड्ड्यात! बामणी-कोठारी मार्गावरील निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली फक्त डांबराचा पापुद्रा? ग्रामस्थांनी केला गंभीर आरोप
  • कोठारी-काटवली मार्गाची दयनीय अवस्था; 28 लाखांच्या निधीवर प्रश्नचिन्ह
  • खड्डे बुजवले की निधी बुजवला? ग्रामस्थांनी ठेकेदारावर केला निकृष्ट कामाचा आरोप
चंद्रपूर: कोठारी, काटवली, बामणी व कोहपरा मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली केवळ निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्डे योग्य पद्धतीने बुजविण्याऐवजी केवळ थातूरमातूर ऑइलमिश्रित डांबर टाकून काम उरकले जात असल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याचे दिसून येत आहे.

गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल; आता…

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत बामणी, काटवली, कोठारी व कोहपरा या गावाना जोडणाऱ्या सुमारे ५.१८ किमी रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण व ०.८२० किमी सिमेंट रस्ता व नालीचे काम २०२२ मध्ये ३५३.६० लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ५ वर्ष रस्त्याची देखभाल व दुरुस्ती डिसेंबर २०२७ पर्यंत करण्याचा करार संबंधित बांधकाम कंपनीसोबत करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे योग्य तांत्रिक पद्धतीने भरले जात नाहीत. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांतच हे डांबर निघून पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत. या कामावर संबंधित विभागाचे अभियंते कधीही प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.

२८.०९ लाख निधीचा होतोय अपव्यय

अनुपस्थितीत अभियंत्यांच्या ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर असलेला २८.०९ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. थातुरमातूर डागडुजीचे काम करून देखभाल व दुरुस्तीचा निधी घशात घालण्याचा प्रयत्न ठेकेदार अधिका-यांच्या सहकार्याने करीत आहेत काय, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

Pratap Sarnaik : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे निर्देश

दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी

ग्रामस्थांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच रस्त्याची दुरुस्ती तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पाहणी करावी आणि निकृष्ट काम थांबवून दर्जेदार दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 3 53 crore rupees road turns into potholes again villagers protest poor work on bamni kothari route chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Chandrapur
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
1

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
3

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
4

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.