Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पावन ‘दक्षिण काशी’ अर्थात वाई शहराचे महात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत प्रथमच अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2026 | 07:14 PM
Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
Follow Us
Follow Us:
  • शिवभक्तांसाठी मोठी बातमी
  • दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
वाई प्रतिनिधी : अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पावन ‘दक्षिण काशी’ अर्थात वाई शहराचे महात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत प्रथमच अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. वाई नगरपरिषद आणि ‘लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २५ मे २०२६ या कालावधीत कृष्णाकाठच्या पवित्र महागणपती घाट येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी वाई नगरपालिकेत विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज तसेच मुख्य आयोजकांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, “हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर या मुख्य कुंभमेळ्यांइतकेच वाईचे धार्मिक महत्त्व आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नसून तरुण पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि साधू-संतांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २१ रोजी गुरुपुष्यामृत योगानिमित्त छावणी भूमिपूजन व छावणी प्रवेश (सकाळी ११ वा.), शुक्रवार दि. २२ रोजी धर्मध्वजा आरोहण (सकाळी ११ वा.), शनिवार दि. २३ रोजी श्री विष्णूयाग व सार्वजनिक हवन, रविवार दि. २४ रोजी हिंदू महासभा व भव्य दीपप्रज्वलन (सायंकाळी ४ वा.) आणि सोमवार दि. २५ रोजी नागा संन्याशांचे पावन स्नान, मान्यवर साधू-संत, आचार्य, महामंडलेश्वर व श्रीमहंत यांच्या भव्य रथ शोभायात्रेसह महिला कलश शोभायात्रा पार पडणार आहे. तसेच दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘श्री कृष्णामाई आरती’ आयोजित करण्यात आली आहे.

Kolhapur News : व्यवसाय परवाना नसलेली दुकाने सील करा; अतिक्रणाविरोधात स्थायी समितीकडे मागणी

या लघु कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देशभरातून येणारे विविध तपस्वी साधू-संत असणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराज, गिरनारचे पीठाधीश्वर तसेच राजस्थान आणि दिल्ली येथील शनी देवस्थानचे पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. विविध विद्यांचे जाणकार, विद्वान, हठयोगी, खडेश्वरी, ऊर्ध्वबाहू आणि नागा संन्याशांची उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेतेही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लाखो भाविकांच्या उपस्थितीचा विचार करून समितीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने चोख व्यवस्था केली आहे. संपूर्ण परिसरावर २४ तास सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, लाईव्ह अनाउन्समेंट सिस्टीम तसेच आपत्कालीन मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधू-संतांसाठी निवास व महाप्रसादाची विशेष सोय करण्यात आली असून रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत केंद्रही सज्ज ठेवण्यात आले आहे.
जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि युट्युब लाईव्हद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज तसेच अटल आश्रम, लघु कुंभ सेवा समिती आणि शिवगंगा टीमने रात्रंदिवस मेहनत घेऊन या सोहळ्याची तयारी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.“दक्षिण काशीच्या या पवित्र भूमीत एवढी ताकद आहे की येथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन परतेल. हा आपल्या परिसरासाठी ऐतिहासिक क्षण आहे. सर्व समाजबांधव, माता-भगिनी आणि तरुणांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून साधू-संतांचे दर्शन घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करावे,” असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.

Gokul Dudh Mahasangh: ‘गोकुळ’वर प्रशासक येणार! हायकोर्टाने मुदतवाढ नाकारल्याने विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का

Web Title: Satara news big news for shiva devotees small kumbh mela organized in dakshin kashi wai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.