Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरातील बालकांच्या पोषणस्थितीचा धक्कादायक अहवाल; 1,749 बालके कुपोषणाच्या विळख्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजार ४४७ अंगणवाडी केंद्रांमधील ६० हजार ५७० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी १ हजार ७४९ बालके मध्यम तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 03:13 PM
Chandrapur News: चंद्रपुरातील बालकांच्या पोषणस्थितीचा धक्कादायक अहवाल; 1,749 बालके कुपोषणाच्या विळख्यात

Chandrapur News: चंद्रपुरातील बालकांच्या पोषणस्थितीचा धक्कादायक अहवाल; 1,749 बालके कुपोषणाच्या विळख्यात

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यात १५५८ बालके मध्यम तीव्र तर १९१ बालके अतितीव्र कुपोषित आढळली आहेत.
  • भद्रावती, ब्रह्मपुरी आणि चिमूरमध्ये प्रत्येकी १८० मध्यम तीव्र कुपोषित बालके असून, वरोरा येथे सर्वाधिक ३० अतितीव्र कुपोषित बालके आहेत.
  • ब्रह्मपुरीत कमी वजनाची सर्वाधिक ९२८ बालके आढळली असून, चंद्रपूर प्रकल्पात सुमारे ९२ टक्के बालके सामान्य वजनाची आहेत.
चंद्रपूर: जिल्ह्यातील पाच वर्षांखालील बालकांच्या पोषणस्थितीचे जुलै २०२६ अखेरचे चित्र समोर आले आहे. १ हजार ७४९ बालके मध्यम तीव्र आणि अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १ हजार ५५८ बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर १९१ बालके अतितीव्र कुपोषित आहेत. त्यामुळे या बालकांच्या पोषण आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Nagpur News : नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा ;वंडरगर्ल दिव्याला अर्जुन पुरस्कार जाहीर!

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ४४७ अंगणवाडी केंद्रांमधील ६० हजार ५७० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ६० हजार ५३७ बालकांचे वजन घेण्यात आले. वजनाच्या आधारे ५१ हजार ३९९ बालके सामान्य, ७ हजार ९९२ बालके कमी वजनाची, तर १ हजार २२६ बालके अति कमी वजनाची आढळली आहेत. जिल्ह्यात वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी ८४.९१ टक्के बालके सामान्य वजनाची आहेत. तर १३.२० टक्के बालके कमी वजनाची, २.०३ टक्के अति कमी वजनाची आहेत. उंची आणि वजनाच्या निकषांनुसार २.५७ टक्के बालके मध्यम तीव्र कुपोषित, तर ०.३२ टक्के बालके अतितीव्र कुपोषित असल्याची नोंद आहे.

नियमित निरीक्षणावर भर आवश्यक

पाच वर्षांखालील वय हे बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे कुपोषणाची लक्षणे वेळेत ओळखून बालकांचे नियमित वजन व उंची मोजणे, पोषण आहार देणे, आरोग्य तपासणी करणे आणि गरजेनुसार उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेषतः १९१ अति तीव्र कुपोषित बालकांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूरमध्ये प्रत्येकी १८० मध्यम तीव्र कुपोषित बालके

मध्यम तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत भद्रावती, ब्रह्मपुरी आणि चिमूर हे प्रकल्प आघाडीवर असून, तिन्ही ठिकाणी प्रत्येकी १८० बालके या श्रेणीत आहेत. त्यापाठोपाठ कोरपना १६१, भद्रावतीनंतर गोंडपिपरी ९६, राजुरा ८८, सिंदेवाही ८०, जिवती ७६, मूल ७२ आणि चंद्रपूर ६४ अशी स्थिती आहे. अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत वरोरा प्रकल्प ३० बालकांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. भद्रावतीत २९, चिमूरमध्ये २२, ब्रह्मपुरीत १९, कोरपन्यात १५, सावलीत १२, मूलमध्ये ११, तर सिंदेवाही, नागभीड आणि गोंडपिपरीत प्रत्येकी ९ बालके अतितीव्र कुपोषित आहेत.

ब्रह्मपुरीत कमी वजनाची सर्वाधिक बालके

कमी वजनाच्या बालकांच्या संख्येत ब्रह्मपुरी प्रकल्पात सर्वाधिक ९२८ बालके आहेत. त्यानंतर चिमूरमध्ये ८९१. नागभीडमध्ये ७१४, मूलमध्ये ६१२, सावलीत ६०१, जिवतील ५९९, कोरपन्यात ५७६ आणि वरोन्यात ५६६ बालके कमी वजनाची आहेत, कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण विचारात घेतल्यास पोंभुर्णा प्रकल्पाची स्थिती अधिक लक्षवेधी आहे. येथे वजन घेतलेल्या १ हजार ७४८ बालकांपैकी ३१६ बालके कमी वजनाची आहेत. जिवती, कोरपना आणि गोंडपिपरी या प्रकल्पांमध्येही कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

चंद्रपूर प्रकल्पात ९२ टक्के बालके सामान्य

चंद्रपूर प्रकल्पात वजन घेण्यात आलेल्या ५ हजार २२९ बालकांपैकी ४ हजार ८०९ बालके सामान्य वजनाची आहेत. हे प्रमाण जवळपास ९२ टक्के आहे, बल्लारपूरमध्ये १ हजार ६८० पैकी १ हजार ५०९, सिंदेवाहीत ४ हजार ४६३ पैकी ३ हजार ९९० आणि राजुरात ४ हजार ११२ पैकी ३ हजार ५९० बालके सामान्य वजनाची आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur reports 1749 malnourished children under 5 191 severely malnourished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
1

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
2

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Raigad News: पाहणी दौरे अन् आश्वासनांची बरसात; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम, गणेशभक्तांचा यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास?
3

Raigad News: पाहणी दौरे अन् आश्वासनांची बरसात; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम, गणेशभक्तांचा यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास?

आंजिवडे गावाचा रस्ता बनला खड्ड्यांचा सापळा; नागरिकांचा प्रशासनावर आरोप
4

आंजिवडे गावाचा रस्ता बनला खड्ड्यांचा सापळा; नागरिकांचा प्रशासनावर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.