Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ताडोबात खाणकामाला विरोध! पर्यावरण प्रेमी आक्रमक, वन्यजीव संकटात

पर्यावरण तज्ज्ञांचा विरोध असून देखील ताडोबा खाण प्रकल्पावर मंजूरी दिली. याच निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय, असं वन्यजीव प्रेमींचं म्हणण आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 01:59 PM
Chandrapur News: ताडोबात खाणकामाला विरोध! पर्यावरण प्रेमी आक्रमक, वन्यजीव संकटात

Chandrapur News: ताडोबात खाणकामाला विरोध! पर्यावरण प्रेमी आक्रमक, वन्यजीव संकटात

Follow Us
Close
Follow Us:
  • ताडोबा खाण प्रकल्पावर तीव्र आक्षेप
  • खाणकामामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती
  • ताडोबातील खाणकामावरून तीव्र वाद
चिमूर: राज्य वन्यजीव मंडळाचा विरोध डावलून राज्य सरकारने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरीडोर प्रस्तावित लोहखणीज प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे पर्यावरण व वन्यजीव संवर्धनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परीणाम ताडोबातील वाघांसह इतर वन्यप्राण्यांवर होणार त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis : “घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय..! अजित पवारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा

२०१९ मध्ये नागपूर येथील एका पोलाद कंपनीने लोखंड खनिज ब्लाक लिलावात मिळविला. हा खाण प्रकल्प ब्रह्मपुरी वनविभागातील कक्ष क्र.४३९ मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वळण अपेक्षित आहे. या परिसरात दाट वनसंपदा व वाघ, बिबट, अस्वल, हरीण, मोर आदी वन्यजीवांचा वावर आहे. १६ आक्टोबर २०२३ ला राज्य वन्यजीव मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चीला गेला. पण मानव वन्यजीव संघर्ष स्फोटक बनल्यामुळे अभ्यास समिती नेमून पुढे ढकलला. या तीन समितीय सदस्य समितीने हा अहवाल तत्कालीन मुख्य वन्यजीव रक्षकांना सादर केला. त्यानंतर हा अहवाल व प्रस्ताव २४ जानेवारी २०२४ च्या वन्यजीव मंडळाच्या स्थायी समिती सदस्यांसमोर मांडण्यात आला.  (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रकल्पाला विरोध असूनही मंजुरी

प्राथमिक अहवालात असं म्हटलं जात होतं की राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे निर्णयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आणि त्याचाच आधार घेऊन पुन्हा प्रकल्पाचा अभ्यास निर्णय घेतला. मंगळवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. पर्यावरण तज्ज्ञांचा या प्रकल्पाला विरोध असूनही हा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ताडोबातील वनसंपत्तीचे जतन करण्यासाठी या प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींमधून करण्यात आली आहे.

‘आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो, फक्त असे भाषण दाखवा’; Uddhav Thackerayचे फडणवीसांना खुले आव्हान

कोणत्याही विकासकामांना आमचा विरोध नाही. पण जंगल क्षेत्रात जर खाण होत असेल तर वृक्ष व वन्यजीव हे उद्ध्‌वस्त होईल. आधीच ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष पेटला असतानाच खाणीला मंजुरी देऊन त्या परिसरातील मानवी जीवन व वाघ, हरीण, बिबट व वन्यप्राणी यांचे जीवन उद्ध्‌वस्त होईल, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा वाघांचा कॅरिडोर आहे. हा निर्णय म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला उध्वस्त करणारा निर्णय आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करावा. – कवडू लोहकरे, वन्यजीव प्रेमी, चिमूर

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chandrapur tadoba mining protest wildlife is in danger chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • tiger
  • Tiger Project

संबंधित बातम्या

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
1

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.