Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत… सर्वत्र दयनीय अवस्था

सिंदेवाही येथील प्रशासकीय भवनाच्या स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इमारतीतील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 03:28 PM
Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत... सर्वत्र दयनीय अवस्था

Chandrapur News: शासकीय कार्यालयातच अस्वच्छतेचे साम्राज्य! पिण्याच्या पाण्यापासून प्रसाधनगृहांपर्यंत... सर्वत्र दयनीय अवस्था

Follow Us
Follow Us:
  • तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये इमारतीत कार्यरत असतानाही स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष
  • इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? – नागरिकांचा सवाल
  • इमारतीतील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय
नवरगाव: नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सिंदेवाही येथील मध्यवर्ती प्रशासकीय भवनाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. तहसील कार्यालयासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये या इमारतीत कार्यरत असतानाही स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, प्रशस्त प्रशासकीय भवनाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या इमारतीची देखभाल करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासकीय भवनाच्या परिसरात प्रवेश करताच अस्वच्छतेचे चित्र दिसून येते.

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक

नागरिकांसाठी बसविण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आरओ यंत्रणेजवळच खर्रा थुंकण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या भिंती, कोपरे आणि जिन्यांच्या परिसरात खर्राच्या पिचकाऱ्या मारण्यात आल्या असून, रिकाम्या पुड्या आणि इतर कचरा सर्वत्र पडलेला आहे. इमारतीच्या वरील मजल्यावरही मोठ्या प्रमाणात कचरा साचून असल्याचे चित्र आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

संबंधित प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन इमारतीची नियमित स्वच्छता करावी, प्रसाधनगृहांमध्ये पाण्याची व्यवस्था करावी, परिसरातील झुडपे हटवावीत तसेच सार्वजनिक ठिकाणी धुंकून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रसाधनगृहांची अवस्था अधिकच बिकट

इमारतीतील प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तेथे पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, इमारतीच्या सभोवताल झुडपे वाढली असून परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतो. त्यामुळे साप, विंचू यांसारख्या विषारी जीवजंतूंचा वावर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Chandrapur News: कन्हाळगाव अभयारण्याच्या प्रस्तावाला ४७ गावांचा विरोध; मुनगंटीवार म्हणाले, ‘इच्छेविरुद्ध निर्णय लादू देणार नाही’

गैरसोय शासकीय कार्यालयातच नागरिकांची

सिंदेवाही तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र असल्याने या भवनात दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक विविध कामांसाठी येतात. मात्र, शासकीय कार्यालयाच्या इमारतीतच स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. शासनाने जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशातून उभारलेल्या या वास्तूची योग्य देखभाल होत नसेल, तर कोट्यवधींचा खर्च करून अशा इमारती उभारण्याचा उपयोग काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Sindewahi government administrative building in poor condition lack of cleanliness raises public concerns hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला
1

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा
2

Sumira Tiwari: कौतुकस्पद! कोणतीही क्लास न लावता १८ व्या वर्षी एनडीए परीक्षेत यश; वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली सुमिरा

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?
3

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम
4

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.