Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

चंद्रपुर शहरात रस्त्यावर उच्छाद मांडणाऱ्या तळीराम, विनाहेल्मेट सुसाट धावणारे आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांच्या पथकाने चौका-चौकात उभे राहून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 28, 2026 | 03:21 PM
Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या ४,४२७ जणांवर कारवाई करत ४१ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • ट्रिपल सीट, अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
  • ड्रंक अँड ड्राईव्ह आणि राँग साईडच्या ४९७ केसेस न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर: शहरातील चौकाचौकात नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेफिकीर वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, संपूर्ण शहरात दंडात्मक धडक मोहीम सुरू केली आहे. रस्त्यावर उच्छाद मांडणाऱ्या तळीराम, विनाहेल्मेट सुसाट धावणारे आणि नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा उगारला गेला. जुलै महिन्यात तब्बल १९ हजार ६२० जणांवर कारवाई करत, पोलिसांनी १ कोटी ६६ लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला.

Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत

जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या संख्येला आळा घालण्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे यांना दिले आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांचे पथक चौका-चौकात उभे राहून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, डोक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या चालकांची संख्या सर्वाधिक आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जुलै महिन्यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ४ हजार ४२७ चालकांवर कारवाई करत सर्वाधिक ४१ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दुचाकीवर तिघे बसून (ट्रिपल सीट) धोकादायक प्रवास करणाऱ्या १ हजार ७०७ चालकांकडून १७ लाख ५ हजार रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते व चौकात अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २ हजार ९१३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत २४ लाख ४८ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्या ९१६ जणांना १० लाख ९९ हजार, तर सीटबेल्ट न वापरणाऱ्या २०६ चारचाकी चालकांना ९ लाख ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४४५ तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. याशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने (राँग साईड) वाहन चालवणाऱ्या ५२ चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने या सर्व ४९७ केसेस दंडासाठी थेट न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत.

Someshwar Sugar Factory Politics: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शहाजी काकडे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी राहणार

शहरातील वाढते अपघात रोखणे आणि वाहतुकीला योग्य शिस्त लावणे हाच या धडक मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. दंडात्मक कारवाई करणे हा पोलिसांचा हेतू नसून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे हा संदेश देणे आहे. विनाहेल्मेट प्रवास, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि राँग साईड वाहन चालवणे हे थेट जीवावर बेतू शकते, त्यामुळे चालकांनी दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे तंतोतंत पालन करावे. – अमोल बारापात्रे, वाहतूक पोलिस निरीक्षक,
चंद्रपूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur traffic police crackdown 19620 violators fined over rs 1 crore 66 lakhs in july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
1

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Heat and Air Pollution: गरमीसोबत वाढतंय प्रदूषणाचं संकट! दमा आणि त्वचेच्या आजारांपासून सावध राहा
2

Heat and Air Pollution: गरमीसोबत वाढतंय प्रदूषणाचं संकट! दमा आणि त्वचेच्या आजारांपासून सावध राहा

Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत
3

Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत

Raigad News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
4

Raigad News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.