• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Collecting Firewood Turns Fatal Tiger Kills Woman Instantly Panic Grips Local Residents Chandrapur News Marathi

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघांच्या घटनांमुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. २३ नोव्हेंबर रोजी वाघाने एका ५४ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 25, 2025 | 03:01 PM
Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण

Chandrapur News: सरपण गोळा करणं भोवलं, वाघाने क्षणात घेतला जीव; नागरिकामध्ये भितीचे वातावरण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाघाच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू
  • वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
  • मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी
जंगलात सरपण गोळा करायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. वाघाने केलेल्या या हल्ल्यामध्ये संबंधित व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी २३ नोव्हेंबर रोजी दुर्गापुराती पायली भटाळा बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये घडली. बाबा नारायण गेडाम (५४, चिंचोली) असे मृताचे नाव आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघांच्या घटनांमुळे जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Raigad News: नगरपरिषदांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात, २ डिसेंबर रोजी होणार मतदान

चिंचोली गावात राहणारे बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून काम करीत होते. सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी १० वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला. गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते. सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले. मात्र वडील घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. त्यांचा काही थांगपत्ता लागला नसल्याने गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. (फोटो सौजन्य – Pinterest)

याबाबत दुर्गापूर पोलिसांना व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली. काही वेळात वनविभाग व पोलिसांची टीम त्याठिकाणी दाखल झाली. गेडाम यांचा शोध घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुऱ्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. रात्री ११ वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हात त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला.

नागरिकामध्ये असंतोष

गेडाम यांचा मृतदेह मिळाल्यावर नागरिकांचा वनविभागवर रोष उफाळून आला. रात्रीपासून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. वनविभागाने नागरिकांना शांत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे पाठविले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Mumbai: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक; अनंत गर्जेनी जरी केले निवेदन

वर्षातील ४० वा बळी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी होता. आतापर्यंत वाधाच्या हल्ल्यात ३६, बिबट २. अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष रोखण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही.

Web Title: Collecting firewood turns fatal tiger kills woman instantly panic grips local residents chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • tiger

संबंधित बातम्या

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण
1

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण

Kolhapur News :  शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
2

Kolhapur News : शेती करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक; दर्जेदार ऊसबियाणे निर्मितीसाठीचा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदल; अभिनयाच्या पलिकडे जाऊन “क्लाऊलिंग” सारख्या कलेकडे वळले ‘हे’ कलाकार
3

शिक्षण, मनोरंजन आणि सामाजिक बदल; अभिनयाच्या पलिकडे जाऊन “क्लाऊलिंग” सारख्या कलेकडे वळले ‘हे’ कलाकार

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….
4

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

Jan 30, 2026 | 10:12 PM
बस्स 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि MG Hector ची चावी तुमच्या हातात पडलीच म्हणून समजा, जाणून घ्या EMI

बस्स 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि MG Hector ची चावी तुमच्या हातात पडलीच म्हणून समजा, जाणून घ्या EMI

Jan 30, 2026 | 09:41 PM
Crime News: अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; 1 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; 1 कोटी 72 लाखांचा मुद्देमाल जप्त

Jan 30, 2026 | 09:40 PM
Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

Budget 2026: भारतात १ फेब्रुवारी, मग पाकिस्तानचा अर्थसंकल्प कधी? तारखेमागचं डोकं चक्रावून टाकणारं कारण नक्की वाचा!

Jan 30, 2026 | 09:38 PM
‘जय जय स्वामी समर्थ’ एका गूढ वळणावर! स्वामीस्थानावर अस्वस्थता… लीलांकडे सर्वांचे लक्ष

‘जय जय स्वामी समर्थ’ एका गूढ वळणावर! स्वामीस्थानावर अस्वस्थता… लीलांकडे सर्वांचे लक्ष

Jan 30, 2026 | 09:19 PM
BMW New Logo: बीएमडब्ल्यूचा लोगो झाला अपडेट! ‘या’ महिन्यांपासून नवीन लोगो दिसणार कंपनीच्या प्रत्येक कारवर

BMW New Logo: बीएमडब्ल्यूचा लोगो झाला अपडेट! ‘या’ महिन्यांपासून नवीन लोगो दिसणार कंपनीच्या प्रत्येक कारवर

Jan 30, 2026 | 09:12 PM
Maharashtra Politics: मोठी बातमी! Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर ‘या’ मंत्रालयांची मिळणार जबाबदारी

Maharashtra Politics: मोठी बातमी! Sunetra Pawar स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद, तर ‘या’ मंत्रालयांची मिळणार जबाबदारी

Jan 30, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.