Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: नागपुरात काँग्रेस सक्रिय, ठाकरे गट बॅकफूटवर? राजकीय गणितं बदलतली, सत्तासंघर्षाची रंगत वाढली

शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2026 | 12:40 PM
Chandrapur News: नागपुरात काँग्रेस सक्रिय, ठाकरे गट बॅकफूटवर? राजकीय गणितं बदलतली, सत्तासंघर्षाची रंगत वाढली

Chandrapur News: नागपुरात काँग्रेस सक्रिय, ठाकरे गट बॅकफूटवर? राजकीय गणितं बदलतली, सत्तासंघर्षाची रंगत वाढली

Follow Us
Close
Follow Us:
  • धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात गटनेतेपदाबाबत वाद
  • चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती
  • मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही
चंद्रपूर: काँग्रेस व भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने आता सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. सत्तेच्या चाव्या हातात घेण्यासाठी भाजप व काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ऑपरेशन लोटस येथे होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सगळ्या नगरसेवकांना नागपुरात पाचारण केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान खा. धानोरकर व आ. वडेट्टीवार यांच्यात गटनेतेपदाबाबत वाद सुरू झाल्याने दोघांतील वर्चस्वाची लढाई काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये महापौरपदावरून जोरदार कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी दिलेल्या एका संकेताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे, तर आ. मुनगंटीवार यांनीही त्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

Raigad News: ‘गुणवत्तेचा नेता की आर्थिक ताकद?’ म्हळसा तालुक्यात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, राजकीय पक्षांची कसोटी

चंद्रपूर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता लहान पक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी एक मोठे विधान केले आहे. गिहे म्हणाले की, ‘आता तडजोडीची वेळ संपली आहे. जो पक्ष आमचा महापौर करण्यास तयार असेल, आम्ही त्याच पक्षाला पाठिंबा देऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ.’ या विधानाने महाविकास आघाडीत आणि युतीतही खळबळ उडवली आहे. असे असले तरी शिवसेना उबाठा शिवाय बहुमताचा जादुई आकडा आपल्याकडे असेल असा विश्वास काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते मंडळी व सहयोगी नगरसेवकांना असल्याने काँग्रेसने आता उबाठाला दूर सारून सत्ता स्थापनेची तयारी सुरू केल्याने शिवसेना उबाठा काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

धानोरकरांकडे १५ तर वडेट्टीवारांकडे १२ नगरसेवक

मनपामध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही, असे असताना महापौरपदाच्या पूर्वी गटनेता कुणाचा यावर ‘ताई व भाऊ मध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात सोमवारी नागपुरात पक्षश्रेष्ठीनी बैठक घेतली, पण तोडगा निघाला नाही. चानोरकर यांच्याकडे १५ तर वडेट्टीवार यांच्याकडे १२ नगरसेवक आहेत, काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत हे विशेष.

शिवसेना उबाठा गटाला कुठल्याही परिस्थितीत महापौरपद दिले जाणार नाही. भाजप आपल्या संख्याबळाच्या जोरावर आणि मित्रपक्षांच्या मदतीने स्वतःचा महापौर बसवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडू.- आ. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर

Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन

आम्ही निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत आघाडी केली व सत्तेसाठी पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. आम्ही शब्दाला जागणारी माणसे आहोत, परंतु, काँग्रेसच्या पूर्वी आमची चंद्रपूरच्या जनतेसोबत कायमची आघाडी आहे. आमची लढाई सत्याची आहे सत्तेची नाही. ती चंद्रपुरातील जनतेच्या हिताची आहे. त्यामुळे, मनपातील भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या एखाद्या माजी नगरसेवकाला काँग्रेसने सत्तेत सामावून घेतल्यास आम्हाला तटस्थ राहण्याच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, तसे झाले नाही तर आम्ही काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊ.- पप्पू देशमुख, नगरसेवक, भाशेकाप

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Congress corporators gear up to form government sideline thackeray faction amid dhanorkar wadettiwar rift chandrapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Nagpur Accident
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली
1

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली

Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित
2

Chandrapur News: फार्मर आयडीची प्रतीक्षा कायम! सीमावर्ती भागातील शेतकरी योजनांपासून वंचित

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा
3

चंद्रपुरात निवडणुकीत उतरले अनेक साक्षर उमेदवार! निरक्षरांची संख्या किती? वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.