एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन (फोटो- सोशल मीडिया)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन
एकनाथ शिंदे यांनी घेतली नगरसेवकांची बैठक
मुंबईत निवडून आले शिवसेनेचे 29 उमेदवार
मुंबई: नुकतीच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महत्वाची निवडणूक समजली जाणाऱ्या मुंबईत महायुतीला बहुमत मिळाले आहे. ”मुंबईतील मतदारांनी दिलेल्या संधीचे सोनं करायचं आहे. तुमचे प्रभाग मुंबईचे सर्वोत्तम प्रभाग बनवण्यासाठी लोकांमध्ये जा, त्यांची कामे करा आणि प्रभागातील कामांचा आराखडा तयार करा, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. मुंबईतील हॉटेल ताज लॅंड्स एंड येथे आयोजित मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत निवडून आलेल्या २९ नगरसेवकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आजपासूनच कामाला लागा, जी संधी आपल्याला मिळाली आहे, त्याचे सोनं करायचं आहे. आपला प्रभाग मुंबईतला सर्वोत्तम प्रभाग कसा होईल, यासाठी प्रत्येक नगरसेवकाने प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंद यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, नगरसेवकांनी लवकर उठून वॉर्डाचा फेरफटका मारावा. वॉर्डमध्ये स्वच्छता, नियमित पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन अशा जनहिताच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष द्यावे.
स्वच्छतेवर काटेकोरपणे भर द्यावा, डीपक्लीन ड्राईव्ह घ्या, वॉर्डात बदल दिसले पाहिजेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. मार्केट, मंडई, व्यायामशाळा, स्पोर्ट्स काम्प्लेक्स असे मोठ्या कामांचे प्रस्ताव तयार करावेत. वॉर्डांमधील आरोग्य सेवा दुरुस्त झाली पाहिजे. शिवसेनेचा नगरसेवक लोकांमध्ये फिरताना दिसलाच पाहिजे. लोकांचे मत जाणून घ्या, त्यांना विकासात भागीदार करा. कोणत्याही कामाला नाही म्हणू नका, नागरिक दुखावला जाऊ नये आणि त्यांच्याकडून एकही तक्रार नसावी, याची काळजी घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरसेवकांना दिले.
Sindhudurga ZP Election: “आम्ही 100 टक्के…”; खासदार नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास
भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला
महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. जनतेला विकास हवाय. महायुती सरकारने घेतलेले निर्णय, पागडीमुक्त मुंबई तसेच ज्या इमारतींना ओसी दिली त्यांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत नगरसेवकांना दिल्या. भाजप आपला मित्र पक्ष आहे. महाराष्ट्राच्या जनतेने उबाठाला नाकारले, असे ते म्हणाले.






