Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना सुरू होऊन जवळपास ३ वर्षे झाली असतानाही ग्रामस्थांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा चौधरी यांनी उपस्थित केला. योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. (फोटो सौजन्य – AI Created)
पावसाच्या अनिश्चिततेमुळे धान पिकाला सिंचनाची गरज असताना कृषी पंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीला आवश्यक वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
चिमूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विहिरी व पाइपलाइनची दुरुस्ती, बंद पडलेले पंप कार्यान्वित करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला. जनतेला केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय हवा. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठीचा आमचा लढा अविरतपणे सुरू राहील.,” अशी भूमिका अशोक चौधरी यांनी मांडली. आता प्रशासन या मागण्यांवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे शेतकरी, लाभार्थी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
शंकरपूर येथील वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांनी मागील वर्षी मानधनासाठी अर्ज केले असतानाही त्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित अर्जाची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मानधन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
पाणी, वीज, शेती, सामाजिक सुरक्षा अनुदान आणि वृद्ध कलाकारांचे मानधन हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी समस्यांची दखल घेतल्याबद्दल अशोक चौधरी यांनी आभार मानले. मात्र, प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
चिमूर तालुक्यातील निराधार, वृद्ध आणि विधवा लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यांत जमा करावे, अशी मागणी चौधरी यांनी केली. यापुढे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी अनुदान मिळेल, यासाठी ठोस व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.






