Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड; ग्राहकांची सर्रास लूट, नागरिकांना कारवाईची प्रतिक्षा

गडचांदूरमध्ये गॅस एजन्सीच्या गैरप्रकारांमुळे ग्राहकांची लूट होत असून प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 02:23 PM
Chandrapur News: गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड; ग्राहकांची सर्रास लूट, नागरिकांना कारवाईची प्रतिक्षा

Chandrapur News: गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड; ग्राहकांची सर्रास लूट, नागरिकांना कारवाईची प्रतिक्षा

Follow Us
Follow Us:
  • छाप्यात गॅस वितरणातील अनियमितता, ओव्हरचार्जिंग आणि बेकायदेशीर साठा उघडकीस आला.
  • तहसीलदारांनी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली असली तरी कारवाई अद्याप प्रलंबित आहे.
  • ग्राहकांना उशिरा सिलेंडर मिळणे, जास्त पैसे घेणे आणि बिल न देणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.
कोरपना: सिमेंट नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसापासून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. कोरपना पुरवठा विभागाकडून दोनदा धाड टाकून एजन्सीची चौकशी केली. संशयीत गॅस एजंसीवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा असा अहवाल १० एप्रिलला तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यावर मोठे राजकीय वजन असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. कारवाई होत नसल्याने ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेऊन लूट करीत असल्याचे धक्कादायक वास्तव्य औद्योगिक परिसरात आहे.

Raigad News: कर्जत तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २० गावे व ३९ आदिवासी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

सदर एजंसीवर धाड टाकत मोठ्या प्रमाणात अनियमितता उघडकीस आणली. तहसील कार्यालयाच्या पथकाने ६ एप्रिल रोजी ही कारवाई केली असून तपासादरम्यान स्टॉक रजिस्टरमधील तफावत, सिलेंडर वितरणातील अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. प्राप्त माहितीनुसार, संबंधित एजन्सीने परवानगी नसताना गॅस सिलेंडरचा साठा ठेवला होता तसेच ग्राहकांना योग्य पद्धतीने वितरण न करता ओव्हरचार्जिंग, विलंब आणि बेकायदेशीर व्यवहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने छापा टाकून तपासणी केली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

तपासादरम्यान अनेक सिलेंडर जप्त करण्यात आले असून त्यांच्या वजनात व नोंदींमध्ये मोठी तफावत आढळली. ऑनलाईन बुकिंग असूनही ग्राहकांना वेळेवर सिलेंडर न देणे, अतिरिक्त रक्कम आकारणे आणि वितरणात अनियमितता करणे या गंभीर बाबी समोर आल्या. सर्व बाबींचा अहवाल तहसीलदारांनी तयार करून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर केला असून संबंधित एजन्सीविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ व एलपीजी नियंत्रण आदेश २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

एसएमएस करून सिलिंडर बुकिंग केले. तब्बल २२ दिवसानंतर सिलिंडर मिळाले तेही १०२० रुपये वसूल करण्यात आले. याचे कुठलेही बिल दिले नाही. या विरोधात गडचांदूर एजंसीमध्ये तक्रार दिली असता येऊन तुम्ही पैसे वापस घेऊन जा असे सांगण्यात येत आहे. अशा अनेक ग्राहकांची दररोज सर्रास लूट होत आहे संबंधित गॅस कंपनीने याकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. – शंकर बाबुरावजी शर्मा, गैस ग्राहक, नांदा

१ एप्रिल रोजी गॅस बुकिंग केले ४ एप्रिलला एजसीने फोन करून डीएससी नंबर घेण्यात आला, सांगण्यात आले की ४/५ दिवसांनी सिलिंडर घरपोच मिळेल, अद्याप सिलिंडर मिळाले नाही. एजंसीमध्ये जाऊन विचारले तेथील मॅडम म्हटल्या गाडी आल्यावर फोन लावू. अजूनपर्यंत सिलिंडर नाही परिणामी लाकडावर स्वयंपाक करावा लागत आहे. शासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.- रेशमा कोरलवार, गॅस ग्राहक नांदाफाटा

Web Title: Gas agency scam in gadchandur overcharging and irregularities exposed action still pending chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Gas Cylinder
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
2

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
3

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
4

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.