
Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
नागभीड येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने तळोधी (बा.) व परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांना उपचारासाठी दूरवरच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात, प्रसूती, सर्पदंश, गंभीर आजार किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तळोधी (बा.) परिसरातील वाढती लोकसंख्या, आजूबाजूच्या गावांची संख्या आणि नागरिकांची आरोग्यविषयक गरज लक्षात घेता येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना तातडीचे उपचार, प्रसूती सेवा, आपत्कालीन सेवा, विविध तपासण्या तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतील. सध्या किरकोळ आजारांसाठी स्थानिक आरोग्य केंद्रांचा आधार घेतला जात असला तरी गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना इतर ठिकाणी हलवावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होतो. अनेक वेळा उपचारासाठी लागणारा विलंब रुग्णांच्या जीवावरही बेतू शकतो. अप्पर तालुक्याच्या दृष्टीने तळोधी (बा.) येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून त्यासाठी आवश्यक इमारत, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तज्ज्ञ डॉक्टर, औषधसाठा, प्रयोगशाळा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.
मृतांना शवविच्छेदणासाठी १५ किमी अंतरावर नागभीड या ठिकाणी न्यावे लागते. त्यामुळे पूर्ण दिवस जातो. वेळेची बचत आणि तळोधी (बा.) व परिसरातील नागरिकांना सोयीस्कर होण्यासाठी शासनाने तळोधी (बा.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावे.- खोजराज मरसकोल्हे, माजी जि. प. सदस्य
एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर 2 दिवस विचारमंथन
संजय गांधी किंवा आवण बाळ या योजनांसाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-याचा सही आणि शिक्का लागत असल्यामुळे नागभीड येथे २० किमी अंतरावर जावे लागते. त्यामुळे पूर्ण दिवस वैद्यकीय तपासणीसाठी जात असल्यामुळे तळोधी (बा.) येथे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन वयस्कर नागरिकांना आर्थिक योजनेसाठी सोईस्कर होईल.- गजानन शेंद्रे, श्रावणबाळ लाभार्थी, सावरगाव