Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मतदारांना आवाहन केलं आहे की, पात्र मतदारांनी प्रारूप यादीतील नोंदी तपासून आपले नाव असल्याची खात्री करावी. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2026 | 02:52 PM
Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Follow Us
Follow Us:
  • रायगडमध्ये २५ लाख ३३ हजार ७३९ मतदारांची नोंद प्रारूप मतदार यादीत करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यात ५ लाख ८४ हजार ११२ गणना प्रपत्रांचे संकलन झालेले नसून, १९ लाख ४९ हजार ३४१ प्रपत्रांचे डिजिटायझेशन अपूर्ण आहे.
  • मतदारांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार असून, ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
अलिबाग: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २५ लाख ३३ हजार ७३९ मतदार नोंदणीकृत असल्याचे प्रारूप यादीत समोर आले आहे. मात्र, यादी तयार करताना मोठी प्रशासकीय तफावत समोर आली असून, जिल्ह्यात तब्बल ५ लाख ८४ हजार ११२ मतदारांच्या गणना प्रपत्रांचे संकलन होऊ शकलेले नाही, तर १९ लाख ४९ हजार ३४१ मतदारांच्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन देखील अपूर्ण आहे. त्यामुळे पात्र मतदारांनी प्रारूप यादीतील नोंदी तपासून आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर 2 दिवस विचारमंथन

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी एसआयआर कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते. ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव समाविष्ट न झाल्यास किंवा नाव जोडायचे असल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करता येणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

डिजिटलायझेशनही अपूर्ण

नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८, नाव वगळण्यास हरकत घेण्यासाठी नमुना ७ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. मतदार नोंदणी व साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेतील. राजकीय पक्षांना प्रत्येक आठवड्याला प्राप्त दावे-हरकतींची यादी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, चुकीची माहिती किंवा घोषणा दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

विधानसभा निहाय मतदार आणि प्रक्रिया स्थिती

पनवेल (१८८)

  • एकूण मतदार – ६, ८४, ०९५, मतदान केंद्रे-५४५
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार -४,००,५६६
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार २, ८३, ३५६
  • मॅच न झालेले मतदार – ८९, १७४
  • अनॉमाली (त्रुटी) असलेले मतदार -६१, १००

कर्जत (१८९)

  • एकूण मतदार ३.१९, ३३७
  • मतदान केंद्रे – ३६२
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार २.५७, ४४२
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार- ६१, ८८१

उरण (१९०)

  • एकूण मतदार ३,५७, २५५
  • मतदान केंद्रे – ३५२
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार-२, ७२, ७७२
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार- ८४, ४१६
Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

पेण (१९१)

  • एकूण मतदार ३,०५,३४३
  • मतदान केंद्रे ३७८
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार-२,६८,२१७
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार – ६८, २१७
  • मॅच न झालेले मतदार ३७, १२२

अलिबाग (१९२)

  • एकूण मतदार ३.०९,५८०
  • मतदान केंद्रे ३७३
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार-२,६६, ८००
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार- ४२,७६०

श्रीवर्धन (१९३)

  • एकूण मतदार ३.६२, ६८०
  • मतदान केंद्रे – ३४५
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार-२.३३, ५६४
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार २९, ११५

महाड (१९४)

  • एकूण मतदार २,९५, ४४९
  • मतदान केंद्रे ३९२
  • डिजिटायझेशन न झालेले मतदार-२, ४९, ९८०
  • प्रपत्र संकलन न झालेले मतदार- ४५, ४६८

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad voter list 2026 update 5 lakh 84 thousand enumeration forms not collected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली
1

एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांमुळे साध्या लोकलची कोंडी; प्रवाशांना फटका, मध्य रेल्वेची चिंता वाढली

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
2

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
3

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी

Dhule : “हिंदू नेतृत्व असताना गाईंची तस्करी कशी?” “धुळ्यात गोरक्षकांचा प्रशासनाला सवाल
4

Dhule : “हिंदू नेतृत्व असताना गाईंची तस्करी कशी?” “धुळ्यात गोरक्षकांचा प्रशासनाला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.