Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर 2 दिवस विचारमंथन
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी एसआयआर कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते. ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची मुदत प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव समाविष्ट न झाल्यास किंवा नाव जोडायचे असल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करता येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८, नाव वगळण्यास हरकत घेण्यासाठी नमुना ७ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. मतदार नोंदणी व साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय घेतील. राजकीय पक्षांना प्रत्येक आठवड्याला प्राप्त दावे-हरकतींची यादी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, चुकीची माहिती किंवा घोषणा दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.






