Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: अनियमित पावसाचा फटका! चंद्रपुरात शेतीचे गणित बिघडले; खरीप पिकेही धोक्यात

चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या अनियमित मान्सूनमुळे खरीप हंगामाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. उशिरा पेरणी, तणनियंत्रणाचा वाढलेला खर्च, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 04, 2026 | 02:32 PM
Chandrapur News: अनियमित पावसाचा फटका! चंद्रपुरात शेतीचे गणित बिघडले; खरीप पिकेही धोक्यात

Chandrapur News: अनियमित पावसाचा फटका! चंद्रपुरात शेतीचे गणित बिघडले; खरीप पिकेही धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • अनियमित मान्सूनमुळे चंद्रपूर जिल्ह्यात खरीप पिकांवर तण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
  • उशिरा पेरणी, दुबार फवारणी आणि मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
  • जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ८० टक्के पावसाची नोंद झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
चंद्रपूर: यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यातील शेतीचे गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या, तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले. उशिरा झालेल्या पेरणीचा फटका कपाशी, सोयाबीन आणि धान पिकांना बसत असून धान, कपाशी व सोयाबीनमध्ये कचरा वाढू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Raigad News: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आंबेनळी घाट अजूनही बंदच, अवजड वाहनांवरील बंदी कायम

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असली तरी काही भागात उशिराने पाऊस झाल्याने पेरणी जुलैच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होती. ज्या शेतांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचले, तेथे दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. यावर्षी पावसाचा अंदाज पाहता धान उत्पादक शेतकऱ्यांनी रोवणीकडे पाठ करत आवत्या टाकण्याला प्राधान्य दिले. दरम्यान पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धानामध्ये कचरा झाला. कचरा मरण्यासाठी फवारणी करायचा विचार केला तर पाणी नाही, यामुळे फवारणी लांबली.

आठ दिवसापूर्वी पडलेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केली. मात्र कचऱ्याची वाढ झाल्याने दुबार फवारणीची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. कपाशीवर तुडतुडे, मावा, पांढरी माशी तसेच गुलाबी बोंडअळीच्या प्रारंभिक हालचाली दिसून येत आहेत. सोयाबीनवर खोडमाशी, पाने गुंडाळणारी अळी व अळीचा प्रादुर्भाव वाढत असून काही ठिकाणी बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसत आहेत. धान पिकातही पाण्याच्या साच्यामुळे करपा व इतर रोगांचा धोका वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार फेरोमोन ट्रॅप, पिवळे चिकट सापळे, संतुलित खत व्यवस्थापन तसेच शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. यंदा तण नियंत्रणासाठी मजुरांची टंचाईही प्रकर्षाने जाणवत असून मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच हवामानाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिक वाढली आहे.

यावर्षी पावसाचा अंदाज पाहूण धान रोवणीच्या ऐवजी आवत्याचा पर्याय स्वीकारला. मात्र कचरा वाढण्याच्या दिवसात पाऊस न पडल्याने फवारणी लांबली. पाऊस पडल्यानंतर फवारणी केली असता कचऱ्याची वाढ झाल्याने कचरा तसाच असल्याने चिंता वाढली. कचऱ्यासाठी दुबार फवारणी करण्याची वेळ आली आहे.

यंदा मान्सूनच्या अनियमिततेमुळे पिकांवर कोणताही मोठा प्रभाव पडलेला नाही. जर काही पिकामध्ये रोग लागल्यास शेतकऱ्यांनी नेहमी शेत पाहणी करून किडीचा प्रादुर्भाव आढळताच कृषी विभागाच्या शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात, अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळावा आणि कृषी सहाय्यकांचा सल्ला घ्यावा.- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांवरून मिरा-भाईंदरचे राजकारण तापले; महापौरांच्या पत्रावरून शिवसेना आक्रमक

सरासरीच्या ८० टक्के पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली. जुलै महीन्याच्या शेवटी काही प्रमाणात पाऊस पडला असला तरी आतापर्यंत सरासरीच्या केवळ ८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जुन महीन्यामध्ये सरासरीच्या ५८.३ टक्के, तर जुलै महिन्यात सरासरीच्या ९१.२ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक पावसाची नोंद बल्लारपूर तालुक्यात झालेली असून, ती सरासरीच्या १६३.२ टक्के एवढी आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद राजूरा तालुक्यात झाली असून सरासरीच्या केवळ ६२.१ टक्के पाऊस पडला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Irregular monsoon hits kharif crops in chandrapur farmers face weed and pest crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.