Raigad News: महाबळेश्वरला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आंबेनळी घाट अजूनही बंदच, अवजड वाहनांवरील बंदी कायम
दरड कोसळल्याने ठिकठिकाणी माती व दगड बाजूला केलेलं दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यातील जाणारे मुख्य दोन घाट मार्ग आहेत. पोलादपूर-वाई-सुरुर राज्य मार्गावरील आंबेनळी तर दुसरा मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट होय. जून २०२६ च्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या. त्या जुलै महिन्यात शेवटच्या टप्यात घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढले होते.
पोलादपूर तालूक्यातुन जाणारा हा घाटमार्ग साडे चोवीस किलोमीटरचा असून रायगड आणि पश्चिम घाटमाथावरील जिल्ह्याना जोडणारा मार्ग म्हणून ओळखला जातो. या घाटाची सर्वसाधारण उंची २०५१ फूट इतकी आहे. गेल्या काही वर्षापासून या घाटात पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात दरडी कोसळत आहेत. वेळोवेळी दरडी हटविण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येत असतो. पावसाळ्यात घाटाची दुरूस्ती करता येत नसल्याने सुरक्षितता व्या दृष्टीने घाट सह मार्ग बंद ठेवण्यात वे आदेश प्रेरित करण्यात येत असतात.
पोलादपूर-वाई-महाबळेश्वर राज्यमार्ग हा वरील अवघड वळणांचा सह्याद्रीच्या डोगररांगातून जाणारा खोलदऱ्या, धोकादायककडे यातून सापासारखा नागमोडी वळणे घेत माथ्यापर्यंत जाणारा घाट म्हणजे आंबेनळी घाट. पावसाळ्यात घाटातील सौंदर्य पाहाण्यासाठी पर्यटक आवर्जून पोलादपूर ते महाबळेश्वर वाई-सुरूर या राज्यमार्गाने प्रवास करतात.
मात्र अलीकडच्या वर्षामध्ये पावसाळ्यात दरडी कोसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, सातारा-वाईला जाण्यासाठी प्रवाशांनी या घाट रस्त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सध्यस्थितीत तुरळक लहान वाहने दुचाकी या घाटमार्गाचा अवलंब करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आजही दरडी व अपघातांचे भय इथले संपले नसल्याचे दिसून येते.






