Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

१ ऑक्टोबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू होत आहे. पावसाळ्यानंतर जंगलातील पाणवठे, तलाव आणि गवताळ भागांमध्ये वन्यजीवांची हालचाल वाढते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2026 | 03:22 PM
Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांना पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या ताडोबाचे नवे रूप अनुभवता येणार
  • वाघाच्या दर्शनासोबतच ताडोबाची समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार
  • नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंतचे अनेक सफारी स्लॉट बुक झाल्याची माहिती
चंद्रपूर: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी आता १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे जंगलप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार आणि पर्यटकांना पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या ताडोबाचे नवे रूप अनुभवता येणार आहे. सफारी सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंतचे अनेक सफारी स्लॉट बुक झाल्याची माहिती आहे.

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

पावसाळ्यात जंगलातील नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन, वन्यजीवांच्या प्रजननाचा कालावधी तसेच वनव्यवस्थापनाची विविध कामे लक्षात घेऊन कोअर क्षेत्रातील पर्यटन बंद ठेवण्यात येते. या विश्रांतीनंतर आता जंगल पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. पावसामुळे ताडोबातील गवताळ प्रदेश, जलसाठे, बांबूची बेटे आणि झाडाझुडपांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्यटन हंगामात ताडोबाचे हिरवेगार आणि निसर्गरम्य रूप पर्यटकांना पाहता येणार आहे. सफारीच्या प्रवेशद्वारांमधून पर्यटकांना जंगलभ्रमंती करता येते. ताडोबा परिसरात वाघांसह बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चितळ, गवा तसेच विविध प्रजातींचे पक्षी आणि अन्य वन्यजीव आढळतात.  (फोटो सौजन्य – AI Created) 

पावसाळ्यानंतर जंगलातील पाणवठे, तलाव आणि गवताळ भागांमध्ये वन्यजीवांची हालचाल वाढते. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणारा पर्यटन हंगाम वन्यजीवप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. वाघाच्या दर्शनासोबतच ताडोबाची समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. दरम्यान, सफारीसाठी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, आगामी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित हॉटेल, रिसॉर्ट, वाहनचालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

२२ सफारी गेट तर बफरमध्ये १६

ताडोबामध्ये एकूण २२ सफारी गेट असून बफरमध्ये १६ तर कोअर झोनमध्ये ६ सफारी गेट आहेत. ताडोबाच्या पर्यटन व्यवस्थेत मोहर्ली, कोलारा, खुटवंडा, नवेगाव, पांगडी, आणि झरी या प्रमुख कोअर प्रवेशद्वारांचा समावेश आहे. तर बफर क्षेत्रात मोहर्ली, कोलारा, नवेगाव तसेच पांगडी-झरी परिसरातील विविध प्रवेशद्वारांमधून पर्यटकांना सफारीचा आनंद घेता येतो.

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

१ ऑक्टोबरपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू होत आहे. सफारीदरम्यान वन विभागाने निर्धारित केलेले नियम, वेळा आणि मार्गदर्शकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पर्यटकांचा सुरक्षित आणि निसर्गपूरक अनुभव हे वन विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यावर्षी विदेशी पर्यटकांना सोयीचे व्हावे यासाठी २० गाईड्सना जर्मन, आणि २० गाईड्सना फ्रेन्च भाषेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सफारीचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वन विभागाच्या संकेतस्थळावरूनच बुकिंग करावे. – डॉ. प्रभूनाथ शुक्ला, प्रकल्प संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Tadoba andhari tiger reserve safari reopens from october 1 bookings get strong response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय
1

Shree Chhatrapati Sugar Factory: ‘छत्रपती’ची वार्षिक सभा गाळ्यांच्या भाडेवाढीवरून तापली; पोटभाडेकरूंना काढण्याचा मोठा निर्णय

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
2

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात
3

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
4

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.