Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू
कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू असल्याचे स्पष्ट झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही आणि पोंभूर्णा या सर्व १२ तालुक्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ लाख ७० हजार २७७ हेक्टरवर लागवड करण्यात आली. त्यापैकी मुख्य पीक असलेल्या कापसाची लागवड १ लाख ९३ हजार ९४४ हेक्टर, धान १ लाख ८६ हजार ४२ हेक्टर, सोयाबीन ५३ हजार ९७६ हेक्टरवर लागवड करण्यात आली. (फोटो सौजन्य – AI Created)
सर्वाधिक फटका धानपिकाला बसलेला असून दुष्काळी भागांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यासह विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. कृषिपंपांच्या चालू वीजबिलातही सूट देण्यात येणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आल्याने त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांना ही सवलत लागू राहणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातही माफी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करण्यासाठी निकष शिथिल करण्यात येणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दुष्काळाचा परिणाम शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेवर होऊ नये, यासाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. जनावरांसाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसेच जलसंधारणाची कामेही हाती घेतली जाणार आहेत.
जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय
‘दिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांव्या पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा सविस्तर अहवाल कृषी आयुक्तामार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.- वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर






