आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर (फोटो- टीम नवराष्ट्र)
आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर
तत्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पालकमंत्री राणे यांनी घडवून आणली चर्चा
सिंधुदुर्ग: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांची बैठक घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकार आंवा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मलय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राष्णे यांनी दिली आहे.
बागायतदारांच्या संदर्भात घेणार एक बैठक
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली. एकंदरीत आंबा काजूची परिस्थिती अशी आहे की या वर्षीचा हंगाम पाहता आंबा गळून पडला आहे. याबावतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळासमोर मांडली.
फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी
बागायतदारांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीर
म्हणण ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्रालयाचे सचिव आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यानी याबाबतच्या परिस्थिची माहिती घेण्यास सांगितली आहे. या एकंदरीत अभ्यासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आबा बागायतदारांच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर घेतली जाईल, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस वानी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकार माणून आबा बागायतदारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेल आहे, अशी माहिती मत्स्य व बदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत
देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






