Chhagan Bhujbal News: राज्यातील फडणवीस सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णय घेतल्यापासून विरोधी पक्षांनी रान उठवलं आहे. पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करू नये, अशी मागणी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या सात जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनही केले जाणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला या आंदोलनामुळे एक नवे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सगळ्या घडामोडींवर राज्याचे व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. “आपल्याकडे चित्रपट, सिनेमा आणि अन्य माध्यमातून हिंदी भाषा सातत्याने कानावर पडत राहते. मला गरज आहे, त्याला हिंदी येत आहे. असं असताना हिंदीची सक्ती का करायची.” असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून लहान मुलांवर या भाषेचा बोजा लादू नये. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, या संदर्भात भाषा तज्ञ आणि साहित्यिकांचीही हीच भूमिका आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनीही हिंदी भाषेची पहिलीपासून सक्ती करण्याची कोणताही गरज नसल्याचे म्हटले आहे. असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही राज्यसरकारच्या या निर्णयावर नागरिकांच्या भूमिका जाणून घेण्यासाटी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, हिंदी भाषेची सक्ती करू नये, असे माझे मत आहे. या विषयावर आलेल्या प्रतिक्रिया पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अंसही म्हटलं आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी जन सुरक्षा विधेयक, विधानसभा निवडणुका आणि कांद्याच्या निर्यातीसंदर्भातील प्रश्नांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ प्रतिक्रीया दिल्या, जन सुरक्षा विधेयकावर बोलताना भुजबळ म्हणाले की, “विधेयक सभागृहात मांडल्यानंतर त्यावर सर्व चर्चा होतील. प्रत्येक आमदाराला अभ्यासपूर्वक मते मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यातून काय निष्पन्न होते, त्यावर सरकार निर्णय घेईल. सध्या काही निष्कर्ष लावणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठी भाषेतील विधेयकातील काही शब्दांवरून होणाऱ्या वादांवर टिप्पणी करताना भुजबळ म्हणाले, “मराठी भाषेत अनेक शब्दांचे अर्थ वेगवेगळे लावले जातात. त्याचं उत्तर दादा भुसे देतील.”
भात खाण्याची ‘ही’ पद्धत सडवेल आतडे, 90% लोक चुकतातच; तयार होताच 1 तासात का खावा Rice
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, महायुती एकत्र निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आमचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी मतभेद असतात. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळे निर्णय होऊ शकतात,” अशी स्पष्ट भूमिका भुजबळांनी मांडली.
“बांगलादेशात सत्तांतर झाल्यामुळे सध्याचे वातावरण भारतविरोधी दिसत आहे. जुनी अध्यक्षा भारतात असल्याने त्यांच्या विरोधात तिथे जनमत निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या द्राक्ष आणि कांद्याची निर्यात बंद आहे,” अशी माहिती भुजबळ यांनी दिली. “या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, केंद्रातील मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना याबाबत काय उपाय करता येतील, यावर विचार करण्यास सांगणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.