मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना धर्मवीर म्हणता येणार नाही. तर ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरुन वाद वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar On Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. वाद संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अजित पवारही लवकरच आपली भूमिका मांडतील, असं शरद पवार म्हणाले. मात्र यानिमित्ताने महापुरुष अवमान प्रकरणात अडचणीत आलेल्या भाजपाला या वादानं अप्रत्यक्ष मदतच झालीये. अजित पवार यांनी भाजपाला मदत करण्यासाठी हे केलं का असा प्रश्न विचारण्यात येतोय. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं राज्यपाल व भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
[read_also content=”भारताची विजयी सलामी! चित्तथरारक सामन्यात भारताचा श्रीलंकेवर २ धावांनी विजय; शिवमचे पदार्पणात ४ बळी https://www.navarashtra.com/sports/india-winning-first-t-twenty-match-against-sri-lanka-india-beat-sri-lanka-by-two-runs-in-thrilling-match-shivam-four-wickets-on-debut-359089.html”]
अजित पवार एकाकी?
दरम्यान, दुसरीकेडे राष्ट्रवादी दोन नेते म्हणजे अजित पवार व जितेंद्र आव्हाड अडचणीत आलेले असताना, त्यांच्या मदतीला महाविकास आघाडीमधील कोणीच आलं नसल्याचं चित्र आहे. एवढच काय शरद पवार आणि खा. अमोल कोल्हे व्यतिरिक्त याप्रकरणी कोणीच भूमिका घेतली नाही. तर काँग्रेस नेते, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी देखील यावर भाष्य करणं टाळलं. पवार कुटुंब आणि आव्हाड सोडून राष्ट्रवादीचे बडे नेतेही या वादापासून लांब राहिलेत. त्यामुळं याप्रकरणी अजित पवार व जितेंद्र आव्हाड एकटेच पडले असं सध्यातरी चित्र आहे.
अजित पवारांच्या वादानं नेमकं काय साधलं?
हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं, त्यानंतर हा वाद पेटून उठला आहे. दरम्यान त्याआधीचे चित्र हे भाजपाच्या विरोधात होते, सीमावाद, राज्यपाल तसेच भाजपाचील अन्य नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य यामुळं भाजपा कोडींत सापडली होती. मात्र अजित पवारांचा वक्तव्यामुळं भाजपाला आता बळ मिळाले असून, त्यांच आत्मविश्वास दुणावला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपाला मदत करण्यासाठी हे केलं का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याचा फायदा भाजपालाच होत असून, मूळ प्रश्नाल बगल देण्यासाठी भाजपाची हि रणनिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. उलट अजित पवारांचा या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस व मविआ बॅकफूटवर पडली आहे, असं राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.