Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला ‘राज’; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका

राज्यातील नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 11, 2026 | 09:27 AM
Women candidates win 31 out of 63 seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad

Women candidates win 31 out of 63 seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad

Follow Us
Follow Us:
  • जिल्हयात जिल्हा परिषदेचे एकूण ६३ गट असून त्यातील ३१ गटांतून महिला विजयी
  • भाजपच्या सर्वाधिक १२ महिला विजयी झाल्या
  • महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) १० महिला जागांसह दुसऱ्या क्रमांकावर
Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहिर झाले आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हयात जिल्हा परिषदेचे एकूण ६३ गट असून त्यातील ३१ गटांतून महिला विजयी झाल्या आहेत. म्हणजेच जिल्हा परिषदेवर निम्म्या महिलांची सत्ता राहणार आहे. या निवडणुकीत भाजप १२ तर शिंदेसेनेच्या १० महिला विजयी झाल्या असून त्या खालोखाल उद्धवसेना ४, राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला प्रत्येकी एक, तसेच काँग्रेस, प्रहारला प्रत्येकी एक तर अपक्षाला दोन जागांवर विजय मिळाला आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर

यापूर्वी राज्यातील नगर परिषद, त्यानंतर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली. या जिल्हयात भाजपच्या सर्वाधिक १२ महिला विजयी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूरमधून मुलतानी माहिन इद्रीस, आमखेडा येथून पुष्पाबाई प्रकाश काळे, सिल्लोड तालुक्यातील केन्हाळातून अनिता मोठे, कन्नड तालुक्यातील हातनूरमधून मिनाक्षी किशोर पवार, जेहमधून मंजूषा जयेश मलदोडे, खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगीमधून प्रतीक्षा विकास कापसे, गदानामधून रेखा प्रकाश चव्हाण, गंगापूर तालुक्यातील सावंगीतून संगीता संदीप आमराव, शिल्लेगावातून सविता संतोष जाधव, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाडमधून साधना रवींद्र कुलकर्णी, दौलताबामधून लंकाबाई रानोबा जाधव, पिंप्री बु. मधून जयश्री परमेश्वर पवार या भाजपच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

Crime News: धक्कादायक! १८ वर्षांच्या मुलाकडून अनावधानाने सुटली गोळी; पोटच्या पोराच्या हातून आईचा मृत्यू

त्याखालोखाल शिंदेसेनेच्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यातून आयशाबेगम नासीर हुसेन सय्यद, शिवन्यातून निकीता राजेंद्र काळे, घाटनांद्रामधून आशा अर्जुन गाडे, अंधारीतून मंगल केशवराव तायडे, वैजापूर तालुक्यातील संवदगामधून निता दिपकसिंग राजपूत, लासूरगावातून संगीता सुभाष तांबे, गंगापूर तालुक्यातील तुर्काबादमधून स्वाती योगेश पाटेकर, पैठण तालुक्यातील आडूळ बु. मधून रूपाली अभिजीत पवार, दावरवाडीतून जयश्री राजू वाघमोडे आणि डोरकिनमधून राधिका दिलीप जगताप यांनी विजय मिळविला आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगावमधून सुनीताबाई चंद्रशेखर चव्हाण, कन्नड तालुक्यातील कुंजखेडामधून सुनंदा अण्णासाहेब चव्हाण, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटीमधून ललिता सुरेश सोनवणे, पंढरपूरमधून विदया रमेश गायकवाड या चार महिला विजयी झाल्या आहेत.

दोन्हीही पवार गटाला प्रत्येकी एक जागा..

या निवडणुकीत जिल्हयातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गंगापूर तालुक्यातील नेवरगावमधून वैजयंती वाल्मीक सिरसाठ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फुलंब्री तालुक्याती पालमधून गितंजली वरूण पाचीकर या विजयी झाल्या आहेत. याशिवाय कन्नड तालुक्यातील नागद गटातून काँग्रेसच्या तूप्ती दिलीपसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगावमधून प्रहारच्या ज्योती सुधाकर शिंदे, तर वैजापूर तालुक्यातील वाकलामधून पार्वतीबाई रामहरी जाधव आणि गंगापूर तालुक्यातील जामगावमधून दीपा सचिन मुंदडा या आपक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत.

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar zp elecction women candidates win 31 out of 63 seats in chhatrapati sambhajinagar zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Panchayat Samiti Elections
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.