Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगाव-संभाजीनगर महामार्गावर ‘३डी लेझर स्कॅनर’ची नजर! अपघाती ठिकाणे शोधून AI करेल विश्लेषण

देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी 'थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स' (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 02:52 PM
जळगाव-संभाजीनगर महामार्गावर '३डी लेझर स्कॅनर'ची नजर! (Phoro Credit - AI)

जळगाव-संभाजीनगर महामार्गावर '३डी लेझर स्कॅनर'ची नजर! (Phoro Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) मोठे पाऊल
  • देशभरातील २०,९०० किमी मार्गांवर ‘नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स’तैनात
  • वेगाने दुरुस्ती शक्य.

सिल्लोड (वा.)/छत्रपती संभाजीनगर: देशभरातील राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी ‘थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स’ (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेत महाराष्ट्रातील एनएच-७५३एफ (जळगाव-छत्रपती संभाजीनगर) महामार्गाचा समावेश आहे. ‘भारतमाला परियोजने’अंतर्गत रस्त्यांच्या गुणवत्तेचे AI-आधारित विश्लेषण केले जाईल. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महामार्गावरील दुरुस्ती जलद होईल आणि अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

महामार्गाची सद्यस्थिती आणि ब्लॅक स्पॉट्स

एनएच-७५३एफ हा २०५ किमी लांबीचा महामार्ग जळगावपासून अजिंठा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरमार्गे पुणे आणि माणगावपर्यंत विस्तारलेला आहे. हा महामार्ग मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र यांना जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे, जिथे दररोज २०,००० हून अधिक लहान व मोठी वाहने धावतात. सप्टेंबर २०२५ च्या अहवालानुसार, जळगाव-पालधी पट्ट्यात ६ ब्लॅक स्पॉट्स (अपघातप्रवण ठिकाणे) ओळखली गेली आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असले तरी, पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल तक्रारी वाढल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

एनएच-७५३एफ (छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्ग) वरील अपघातप्रवण क्षेत्रे

  • चौकाजवळ तीव्र वळण: रात्री प्रकाशयोजनेचा अभाव असल्याने येथे वारंवार अपघात होतात.
  • अरुंद रस्ता व घसरडा उतार: विशेषत: पावसाळ्यात वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडतात.
  • पालधी संवाद टाऊन चौक (जळगाव टोल नाका): येथे वाहतूक घनता जास्त असून, चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे दुर्घटना वाढतात.
  • स्थानिक वाहतुकीचा दबाव: चौकांवर सिग्नल नियंत्रण नसल्यामुळे अपघात वाढले आहेत.

‘NSV’ तंत्रज्ञान कसे काम करते?

एनएसव्ही वाहनांवर ३डी लेझर स्कॅनर, जीपीएस (GPS) आणि ॲक्सिलरोमीटर बसवलेले आहेत. हे स्कॅनर रस्त्याच्या प्रत्येक सेंटीमीटरची स्कॅनिंग करतात. ते खड्डे, तडे आणि उंचसखल भागांची अचूक ३डी प्रतिमा (3D Image) तयार करतात. हा डेटा NHAI च्या AI-आधारित ‘डेटा लेक’ (Data Lake) पोर्टलवर अपलोड होतो. येथे तज्ज्ञ विश्लेषण करून दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणांची प्राधान्यसूची तयार करतात. या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय रस्त्यावरील दोष त्वरित नोंद होतात, ज्यामुळे देखभाल खर्चात २०% पर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. रस्ता विकासापूर्वी आणि नंतर प्रत्येक सहा महिन्यांनी हे सर्वेक्षण केले जाईल.

अवघ्या 1230 रुपयांच्या बिलासाठी हॉटेलचालकाला तिघांची बेदम मारहाण; एकाने तर हातातील कड्याने…

Web Title: 3d laser scanner eyes on jalgaon sambhajinagar highway ai will find and analyze accident spots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • National Highways

संबंधित बातम्या

नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! ८७१९ कोटींच्या विकास आराखड्याचे काम मात्र कागदावरच
1

नाशिकच्या तयारीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या तीर्थक्षेत्रांकडे पर्यटकांचा ओघ! ८७१९ कोटींच्या विकास आराखड्याचे काम मात्र कागदावरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.