Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

प्रशासकीय फेरबदलाचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण पोलिस दलावरही दिसून आला आहे. पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळे जिल्ह्याला १२ नवे अधिकारी मिळाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2026 | 03:11 PM
संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्य गृह विभागाने मंगळवारी पोलिस निरीक्षक ते उपअधीक्षक (डीवायएसपी) आणि सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) पदोन्नती तसेच बदल्यांचे आदेश जाहीर केले. राज्यभरातील २२४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली असून, ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. या प्रशासकीय फेरबदलाचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण पोलिस दलावरही दिसून आला आहे. पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळे जिल्ह्याला १२ नवे अधिकारी मिळाले असून, चार अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विद्यमान पदावर एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहर व ग्रामीण पोलिस प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. यामुळे विविध शाखांतील प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक पदावरून डीवायएसपी किंवा एसीपी पदावर पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संजय देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा, ग्रामीण), दिपाली भुजबळ (मुख्यालय, लोहमार्ग), वैशाली चांदगुडे (राष्ट्रीय महामार्ग संरक्षण), स्वाती थोरात (ग्रामीण मुख्यालय), विश्वजित काईगडे (सिल्लोड उपविभाग), संजय नाळे (जात पडताळणी समिती), प्रविण खाणापुरे (एसआयडी) आणि मजहर अली सय्यद (शहर एसीपी कार्यालय) यांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रशेखर कदम आणि नरेंद्र पाडळकर यांनाही पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती शहरातच कायम ठेवण्यात आली आहे.

चार अधिकारी जिल्ह्याबाहेर

पदोन्नतीनंतर उपअधीक्षक सतीश वाघ यांची हिंगोली येथे, किशोर चौधरी यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे, तर सुनिल माने यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. ब्रम्हदेव गावडे यांची पुणे शहर पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.

पूजा नांगरे, सुभाष भुजंग यांना बदलीपासून दिलासा

ग्रामीण विभागाच्या उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे आणि शहरातील सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांना त्यांच्या विद्यमान पदावर आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामकाजाची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. प्रशासनातील सातत्य राखण्यासाठी ही मुदतवाढ महत्त्वाची ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

दोन अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

या आदेशात दत्तात्रय थोपटे यांची जात पडताळणी समितीत, तर दिनेशकुमार कोल्हे यांची अतिरिक्त अधीक्षक, सीआयडी पदावर बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे संबंधित विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप होणार आहे.

Web Title: A major reshuffle has been carried out in the chhatrapati sambhajinagar police force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.