Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच; पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती

छत्रपती संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवरील महापालिकेची कारवाई केवळ नोटिसांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जुन्या शहरातील दाट लोकवस्तीत दुर्घटनेचा धोका वाढला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 27, 2026 | 02:49 PM
महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच (Photo Credit- X)

महापालिकेचा भोंगळ कारभार! संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • महापालिकेचा भोंगळ कारभार!
  • संभाजीनगरमधील ८० धोकादायक इमारतींवर कारवाई कागदावरच
  • पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहर शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींविरोधातील महापालिकेची कारवाई अद्याप कागदोपत्रीच असल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याचा मध्य गाठला असतानाही शहरातील सुमारे ८० धोकादायक इमारतींच्या मालकांना केवळ नोटिसा बजावण्यात आल्या असून, प्रत्यक्षात एकाही इमारतीचे पाडकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढला असून नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी होत आहे.

महापालिकेच्या सर्वेक्षणात शहरातील अनेक इमारती धोकादायक म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. विशेषतः जुन्या शहरातील दाट लोकवस्तीच्या आणि व्यापारी भागांमध्ये अशा इमारतींची संख्या अधिक आहे. या भागातून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मान्सूनपूर्व काळात धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर पाडकामाची कारवाई अपेक्षित होती. मात्र, प्रशासनाने नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही प्रभावी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात इमारत कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

महापालिकेने धोकादायक इमारतींवरील कारवाईची जबाबदारी संबंधित झोन कार्यालयांवर सोपविली असली, तरी कोणत्याही झोनकडून अद्याप प्रत्यक्ष पाडकाम सुरू झालेले नाही. परिणामी, धोकादायक इमारती हटविण्याची मोहीम केवळ आदेश आणि नोटिसांपुरतीच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे.

जुन्या शहरातील भाग सर्वाधिक धोक्यात

महापालिकेच्या यादीतील बहुतांश धोकादायक इमारती जुन्या शहरातील व्यापारी व दाट लोकवस्तीच्या भागात आहेत. सराफा बाजार, मुलूमची बाजार, शहागंज, चौराहा, टिळकपथ, गुलमंडी, नाझ गल्ली, नगरखाना गल्ली, केळीबाजार, खाराकुंवा, दलालवाडी, भांडीबाजार, सुपारी हनुमान रोड तसेच बारूदगर नाला परिसरात अशा इमारतींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि व्यापाऱ्यांची वर्दळ असल्याने धोका अधिक गंभीर मानला जात आहे.

अमलबजावणीची प्रतीक्षा अजूनही कायमच

धोकादायक इमारतींवर कारवाईची जबाबदारी संबंधित झोन कार्यालयांना देण्यात आली आहे. सर्व झोन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही ठिकाणी पाडकाम सुरू झाल्याचे दिसत नाहीत.

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट

Web Title: Action against 80 dangerous buildings in sambhajinagar remains only on paper fear of a major disaster during the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.