Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! १.०५ लाख शेतकरी पात्र, मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच

Karj Mafi e-KYC Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली आहे. सविस्तर आकडेवारी व माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 31, 2026 | 03:49 PM
Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! (Photo Credit- X)

Karj Mafi e-KYC: कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद!
  • १.०५ लाख शेतकरी पात्र
  • मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच
Chhatrapati Sambhajinagar: कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्हाभरातील एक लाखांवर शेतकरी पात्र ठरले, परंतू आतापर्यंत केवळ ३९ हजार शेतकऱ्यांनीच केवायसी केली आहे. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा आलेख रोखण्यासाठी प्रशासनाची केविलवाणी धडपड दिसते, परंतू दुसरीकडे हेच प्रशासन जिल्हाभरातील शेतकऱ्यांची ईकेवायसी करुन घेण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कर्जमुक्ती योजना व ई-केवायसीची सद्यस्थिती

कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावोगावी प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी जाऊन आपले नाव असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा बँका, विविध कार्यकारी सोसायटी, बैंक, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी गर्दी केली होती. राज्य सरकारने गाजावाजा करत पात्र ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना आणली. या योजनेसाठी जिल्हाभरातील १,२७६ गावांमधील जवळपास १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. परंतू पात्र शेतकऱ्यांपैकी २९ जुलैअखेर ३९ हजार २६६शेतकऱ्यांनीच ईकेवायसी पूर्ण केल्याने त्यांनाच प्रत्यक्ष फायदा होणार आहे. जिल्हाभरातील एकूण एक लाख ९० हजार ७०१ कर्ज खात्यांपैकी डीसीसी बँकेचे ५५ हजार ९८१ कर्जखाती आहेत. तर उर्वरित बँकांची एक लाख ३४ हजार ७२० कर्जखाती आहेत.

७६७ केंद्रांवर होणार केवायसी

जिल्हाभरातील ७६७ आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही केवायसी करण्यासाठी केंद्र चालकांनी कोणतेही शुल्क आकारु नये असे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत केवायसी करुन घेता येणार आहे.

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

असे आहे जिल्ह्यातील कर्जखात्यांचे प्रमाण

जिल्ह्यात एकूण कर्जखाती
१,९०,७०१
पोर्टलवर अपलोड कर्जखाती
१,०५,१२८
आधार प्रमाणीकरण (केवायसी) खाती
३९,२६६
केवायसी बाकी कर्जखाती
६५.८६२

८८ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, ही समाधानाची बाब आहे. लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी जाहीर केली. या लाभार्थीना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. केवायसीसाठी शेतकरी संबंधीत केंद्रांवर जातात परंतु

केवायसीसाठी स्वतंत्र शिबिरे का नाहीत?

महत्त्वाचे म्हणजे महाराजस्व अभियानातून शेती, महसूलची सर्व प्रलंबित कामे यातून निपटली जातात, मग केवायसीसाठी स्वतंत्र शिबिर का घेतले जात नाही, असा सवाल कृषी जाणकारांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील केंद्रावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने ग्रामीण भागात केवायसी शिबिरे घेऊन शेतक-यऱ्यांना दिलासा द्यावा. – नाना पाटील, शेतकरी 

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामांच्या बेटरमेंट चार्जेसमध्ये १००% सूट

Web Title: Ahilyadevi holkar karj mukti yojana ekyc pending chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • e-KYC
  • farmer

संबंधित बातम्या

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
1

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
3

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.