Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत १.८० लाख शेतकऱ्यांचे १६३२ कोटींचे कर्ज माफ झाले आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 01:27 PM
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
Follow Us
Follow Us:
  • छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी
  • ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
  • वाचा संपूर्ण बातमी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शेतकऱ्यांसाठी शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार १७६ खातेदार कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास पात्र ठरले असून त्यांचे सगळ्यांचे मिळून १६३२ कोटी १२ लक्ष रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रियकृत, सहकारी बँकामार्फत कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम १६३२ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे. आधार संलग्नीकरणानंतर ही आकडेवारी बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेली आहे.

खातेदारांनी तत्काळ आधार संलग्निकरण करावे

आणखीन खातेदारांचे आधार संलग्निकरण व अन्य प्रक्रिया पार पडल्यावर या संख्येत वाढ होऊ शकते, असेही मोघे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अद्याप ७१२ खातेदार असे आहेत की ज्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यात बँक ऑफ इंडिया-१, बँक ऑफ बडोदा-४८४, बँक ऑफ महाराष्ट्र-१६२, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया-२, जिल्हा मध्यवर्ती बँक-५, महाराष्ट्र ग्रामिण बैंक-१२, स्टेट बैंक ऑफ इंडिया-४०, युनियन बैंक ऑफ इंडिया-६ असे एकूण ७१२ खातेदार आहेत. या खातेदारांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आधार संलग्निकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मोघे यांनी केले.

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

७१२ जणांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस अंतर्गत अदा केली जाईल. २०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांचा ओटीएस लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

काय आहेत निकष

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

Web Title: Ahilyadevi holkar shetkari karjmukti yojana 2026 aadhaar linking pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच
2

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
3

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.