Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

वैजापूर शहरातील इंदिरानगर येथील विवाहित महिला मजूर कविता लोधे यांचा शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे संतप्त नातेवाईकांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 03:20 PM
महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
Follow Us
Follow Us:
  • महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी!
  • शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू
  • संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
वैजापूर (वा.): शहरातील इंदिरानगर परिसरातील एका कष्टकरी महिलेच्या आयुष्याचा मंगळवारी दुपारच्या सुमारास दुर्देवी शेवट झाला. ही घटना टाळता आली असती. परंतु महावितरणच्या कारभाराच्या निष्काळजीपणाची ती बळी ठरली. शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या विवाहित महिलेचा शेतातील खाली लोंबकळणाऱ्या वीजतारेचा स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांसह नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून महावितरण विभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे.

कविता संतोष लोधे (वय ३५, रा. इंदिरानगर, वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कविता आणि त्यांचे पती संतोष लोधे हे दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी पती-पत्नी रात्रंदिवस मेहनत घेत होते. मात्र नियतीने एका क्षणातच त्या दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र हिरावून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता लोधे ही मंगळवारी शहरातील द्वारका लॉन्स परिसरालगत असलेल्या गट क्रमांक १५९/२ मधील शेतात पेरणीच्या कामासाठी मजुरीस गेली होती. दुपारच्या सुमारास ती इतर मजुरांसोबत काम करत असताना जेवणासाठी उठली. त्याचवेळी खालीपर्यंत लोंबकळणारी वीजतार तिच्या डोक्याला लागली. त्या तारेतून प्रवाहित होणारा विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की, तिचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार असलेल्या महिलेचा काही क्षणांत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.

या दुर्घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, शेतापर्यंत खाली लटकणाऱ्या वीजतारेबाबत महावितरण विभागाने वेळेत उपाययोजना का केल्या नाहीत? वीजतारांची नियमित तपासणी व आवश्यक दुरुस्ती करण्यात आली असती, तर आज ती महिला जिवंत असती, अशी भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी ही केवळ दुर्घटना नसून विभागाच्या कथित हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि मोठ्या संख्येने नागरिक महावितरण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. जबाबदारांवर कायदेशीर कारवाई होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.

सायंकाळी सात वाजेपर्यंत महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला. कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच विभाग का जागा होतो? अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. वेळेत वीजतारांची देखभाल करण्यात आली असती, तर एका गरीब कुटुंबावर ही वेळ ओढवली नसती, असेही त्यांनी सांगितले.

कारवाईचे आश्वासन

या घटनेनंतर महावितरणचे अधिकारी आणि मृत महिलेच्या नातेवाईकांमध्ये अनेक वेळा चर्चा झाली; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही. विभागाच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी एका जेसीबी चालकाने नाल्याचे खोदकाम केल्यामुळे वीजखांबाला दिलेला आधार सैल झाला आणि त्यामुळे वीजतार खाली लटकू लागली. संबंधित जेसीबी चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले.

पोलिस बंदोबस्त तैनात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनानेही मोठा बंदोबस्त तैनात केला होता. उशिरापर्यंत नातेवाईक आणि नागरिक महावितरण कार्यालयात ठिय्या देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत होते. या घटनेमुळे सरकारी विभागांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

Web Title: Vaijapur woman labourer electrocuted to death due to msedcl negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Accident News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • mahavitaran
  • Vaijapur

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
4

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.