Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar: ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे

मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर दिलेल्या आश्वासनानंतर आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आंदोलन स्थगित केले आहे. कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 03:54 PM
गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे (Photo Credit- X)

गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण…’
  • गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे
  • मुंबईत होणार बैठक
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे ‘एल्गार आंदोलन’ अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आंदोलनस्थळी थेट फोनवरून संपर्क साधून मध्यस्थी केली. उद्याच (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कर्जमाफीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या आश्वासनानंतर रोहित पवारांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

पदाचा मान ठेवून पुन्हा एक वेळ विश्वास ठेवला

आंदोलन स्थगितीबाबत अधिकृत भूमिका मांडताना आमदार रोहित पवार म्हणाले, यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नव्हता, हा इतिहास आहे. मात्र, तरीही त्यांच्या मंत्रिपदाचा आणि शासनाचा मान ठेवत आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सकाळपासून या आंदोलनामुळे अनेक सामान्य नागरिक रस्त्यावर अडकले होते, तसेच आमचे पोलीस बांधवही कडक बंदोबस्तासाठी तैनात होते; त्यांच्या त्रासाचा विचार करून आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करत आहोत.

…अन्यथा सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ!

रोहित पवार यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, आता मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या मुंबईत कर्जमाफीच्या अटीशर्ती काढण्याबाबतच्या बैठकीचे नियोजन होईल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. मात्र, जर महायुती सरकारने पुन्हा एकदा विश्वासघात केला, तर यापुढे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला जाणार नाही. तसेच, येत्या काळात संपूर्ण राज्यात यापेक्षाही अधिक मोठे आणि व्यापक जनआंदोलन पुकारून आम्ही शेतकऱ्यांची वज्रमूठ आणि ताकद सरकारला दाखवून देऊ.” रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि ‘जेल भरो’च्या इशाऱ्यामुळे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून चर्चा केली. आता मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कर्जमाफीच्या २०१९ च्या अटी आणि ५० हजारांची मर्यादा यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

आंदोलनात कोण कोण उपस्थित होते

या एल्गार आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांसह खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते. मा. अनिल देशमुख साहेब, खा. निलेश लंके जी, खा. कल्याण काळे जी, खा. अमर काळे जी, खा. बजरंग सोनवणे, मा. राजेश टोपे साहेब, आ. संदिप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलनस्थळी पोलिसांचा छावणी

छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनस्थळी सध्या प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची आणि बळीराजाचा आवाज दाबण्याची पूर्ण तयारी सरकारने केली होती.

आंदोलनाला मोठा पाठिंबा

या एल्गार आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनीही आपली आक्रमक भूमिका मांडली. शेतीमालाचे घसरलेले दर, रखडलेली कर्जमाफी आणि इतर प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिक आणि विविध शेतकरी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत असून, आगामी काळात हे आंदोलन राज्यामध्ये मोठे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्ष आणि नेते फोडणाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही

रोहित पवार यांनी सरकारला घेरताना फोडाफोडीच्या राजकारणावरही प्रहार केला. जे सरकार स्वतः पक्ष आणि नेते फोडून सत्तेवर आले आहे, त्यांना फक्त फोडाफोडीचेच राजकारण आवडते आणि जमते. सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा टोला त्यांनी लगावला. याचसोबत त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा गंभीर उल्लेख करत, या घोटाळ्यात सरकारच्या जवळच्याच व्यक्तींचा थेट संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

Web Title: Rohit pawars elgar agitation temporarily called off following girish mahajans mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Farmer Protest
  • girish mahajan
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
4

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.