Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ !” छ. संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावरून अंबादास दानवे संतप्त

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील १०० दिवसांच्या कारभारानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 03:44 PM
'सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो...'; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

'सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो...'; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • छ. संभाजीनगर महापालिकेतील १०० दिवसांच्या कारभारानंतर आमदार अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
  • ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत अंबादास दानवे यांनी जाहीर केला ‘कारभाराचा’ पंचनामा’
  • घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही – अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील १०० दिवसांच्या कारभारानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासकामांच्या घोषणेमध्ये आणि प्रत्यक्षात केलेल्या कामांमध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ पंचनामा’ जाहीर केला आहे. यावरून छ. संभाजीनगर महानगरपालिकेतील कारभारावर त्यांनी पडदा टाकला असून जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ हा जाहीर पंचनामा! घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही. ​सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे:

“हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने स्वतः ‘हेरिटेज वॉक’ सुरू केल्याचे सांगतात. मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत. महापालिका त्यात जाऊन बसली एवढंच! पाणीप्रश्न अधिक बिकट, नागरिक टँकरच्या विळख्यात: पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. ५-६ दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे ३ (१२० मिनिटे सरासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.”

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ हा जाहीर पंचनामा! घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही. ​सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे: हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने… — Ambadas Danve (@iambadasdanve) May 21, 2026

“आरोग्याशी क्रूर खेळ: पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत. मान्सूनपूर्व कामांचे वाटोळे: पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.”

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य

“सामान्यांचे मरण, पदाधिकाऱ्यांची चंगळ: सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकीकडे मनपा १२०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी आहे! ​केवळ ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’ आणि ‘२०४७ चे व्हिजन’ अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा १०० दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे!”

अंबादास दानवे यांच्या या ट्विटनंतर छ. संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चाना जोर आला असून आता सत्ताधारी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

Web Title: Ambadas danve slams governance of chhatrapati sambhajinagar municipal corporationa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
1

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले
2

Chhatrapati Sambhajinagar: शुक्रवारपर्यंत पम्पिंग सुरू कराच! कामातील दिरंगाईवर आयुक्त अमोल येडगे संतप्त; एजन्सीला फटकारले

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
3

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश
4

६७ कोटी पाण्यात! पडेगाव कचरा प्रकल्प की डम्पिंग ग्राउंड? अंबादास दानवे आक्रमक; पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.