Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राम मंदिर दानपेटी प्रकरणाचा उल्लेख केला.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 04:40 PM
'दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?' शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

'दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?' शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Follow Us
Follow Us:

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना याबाबत मोठे विधान केले आहे.

शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं मत स्पष्टपणे मांडत असतो. आज लोक महागाई, वीज, पाणीटंचाई यांसारख्या प्रश्नांवर उघडपणे बोलत आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत.” त्यांनी या चर्चांवर अधिक भाष्य करण्याचे टाळत हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले.

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ भाजपवर आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

यानंतर भाजपवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “आज कोणताही पक्ष, आमदार, खासदार किंवा नगरसेवक अधिकृत किंवा अनधिकृतपणे भाजपसोबत जाण्याचा विचार करत असेल, तर त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा. जी लोकं राम मंदिराची दानपेटीही सोडत नाहीत, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणार का?” तसेच त्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपले आणि सोनम वांगचूक यांचाही उल्लेख करत, “देशासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात भाजपसोबत जाणार का?” असा सवाल उपस्थित केला.

एनडीए प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांच्या भेटी झाल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, या विषयावर अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही.

Anjali Damania News: अहंकार…फक्त आणि फक्त अहंकार! ‘मिसिंग लिंक’च्या भगदाडावरून अंजली दमानियांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

राज्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी शिवसेना ठाकरे गटातून खासदार  फुटल्यानंतर आता महाविकास आघाडीमधूनही आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात आणखी काय घडामोडी होतात हे पाहणारे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Aditya thackeray on sharad pawar nda bjp reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BJP
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार
2

Shiv Sena BJP Clash: शिवसेना-भाजपमध्ये जुंपली! गोपाल लांडगेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले; भाजपचा जोरदार पलटवार

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Karjat News : पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे
4

Karjat News : पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.