Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मातृत्व हा गुन्हा नाही!”; गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

गरोदरपणामुळे नोकरी नाकारणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे सांगत औरंगाबाद खंडपीठाने एका महिला डॉक्टरला CRPF मध्ये रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर निकाल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 02:12 PM
गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर

गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर

Follow Us
Follow Us:

 

  • “मातृत्व हा गुन्हा नाही!”
  • गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर
  • औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): गर्भवती असणे हा कोणताही आजार नाही, त्यामुळे केवळ गरोदरपणाचे कारण पुढे करून एखाद्या महिलेची नियुक्ती रोखणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा उच्च महत्त्वपूर्ण निकाल मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांनी दिला आहे. न्यायालयाने या संदर्भातील आदेश रद्द ठरवत याचिकाकर्त्या महिला डॉक्टरला कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्त्यांना कामावर रुजू करून घेण्यापूर्वी सीआरपीएफ डीआयजी यांच्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’ च्या अधीन राहूनच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. याचिकाकर्त्यांना १९५९ च्या गृह मंत्रालयाच्या नियमावलीनुसार वरिष्ठतेचे सर्व लाभ दिले जातील. यामुळे त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती मिळण्याचे आणि त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सेवाविषयक लाभांचा मार्ग
मोकळा झाला आहे.

याचिकाकर्त्या डॉ. रेणुका शिवाजी बुणगे यांची केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (ग्रेड-२) या पदावर निवड झाली होती. ८ ऑगस्ट
२०२५ रोजी त्यांना नियुक्तीपत्र मिळाले आणि त्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेल्या. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्या १६ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे आढळले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; १० तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव

स्वामीज मॅन्युअलमधील नियमांचा हवाला देत, सीआरपीएफने त्यांना तात्पुरते अनफिट ठरवले आणि त्यांची नियुक्ती स्थगित ठेवली. या अन्यायाविरुद्ध डॉ. रेणुका यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गर्भधारणा शारिरीक व्याधी, आजार नाही

खंडपीठाने निरीक्षण नोंदविले की, गर्भधारणा ही कोणतीही शारीरिक व्याधी किंवा आजार नाही. त्यामुळे या कारणावरून नियुक्ती नाकारणे हे राज्यघटनेच्या कलम १४ आणि १६ चे उल्लंघन आहे. पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाच्या स्वरूपात फरक आहे. डॉक्टरांना पोलिसांप्रमाणे कठीण शारीरिक प्रशिक्षणाची तातडीने गरज नसते, त्यामुळे त्यांना गर्भवती असतानाही रुजू करून घेता येते. महिलेला तिचे मातृत्व आणि नोकरी यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडणे, हे तिच्या प्रजनन अधिकारांवर गदा आणणारे आहे. अशा कृतीला आधुनिक भारतात स्थान नाही. खंडपीठाने केंद्र सरकार आणि सीआरपीएफचा तो आदेश रद्द केला. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. डी. सपकाळ, अॅड रोहित पाटील यांनी बाजू मांडली, तर केंद्र सरकारतर्फे अजय तल्हार यांनी काम पाहिले.

Fuel Shortage: संभाजीनगरमध्ये इंधन संकट! पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग; प्रशासनाचा दावा फोल?

Web Title: Aurangabad bench verdict pregnancy not an illness crpf lady doctor job rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Aurangabad Bench
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Pregnant woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.