परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि गुणवत्तेवर आधारित निकाल सुनिश्चित करण्यासाठी या अभियानांतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. कॉपीमुक्ती ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरावी, यासाठी शिक्षण मंडळाने कठोर पाऊले उचललेली आहेत.
परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके अचानक तपासणी करून परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. मोठ्या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका नेणे व उत्तरपत्रिका गोळा करण्या-साठी गरजेनुसार शासकीय वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाहनांसोबत पोलिस कर्मचारी असणे बंधनकारक राहणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे हवेतून निगराणी ठेवण्यात येणार आहे. तसेच केंद्राबाहेरील परिसरात व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षेस सामोरे जाताना मंडळाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करेन. मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेल.तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने, निर्भीडपणे व तणावविरहित सामोरे जाईन. मी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी व बारावी-च्या परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करीत सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.






