Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय्य तृतीयेचा ‘सुवर्ण’ मुहूर्त! बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल; वाहन आणि सराफा बाजारात मोठी तेजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ४०० कोटींची उलाढाल झाली. सराफा बाजार आणि वाहन विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, ३ हजार नवीन दुचाकींची विक्री झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 02:42 PM
अक्षय्य तृतीयेचा 'सुवर्ण' मुहूर्त! बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल (Photo Credit- AI)

अक्षय्य तृतीयेचा 'सुवर्ण' मुहूर्त! बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • अक्षय्य तृतीयेचा ‘सुवर्ण’ मुहूर्त!
  • बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल
  • वाहन आणि सराफा बाजारात मोठी तेजी
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संभाजीनगर शहरातील बाजारपेठा अक्षरशः गजबजून गेल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. रिअल इस्टेट, सराफा, कापड आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली. खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारपेठांकडे पावले वळवल्याने प्रमुख व्यावसायिक भागांत मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवभरात अंदाजे ४०० कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा व्यापारी सूत्रांचा अंदाज आहे.

बाजारपेठेवर फारसा परिणाम नाही

मध्यपूर्व देशांमध्ये सुरु असलेली युद्धामुळे यंदा अक्षय्य तृतीयेला ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत व्यापाऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र बाजारपेठेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. अक्षयतृतियेचा मुहूर्त उत्तम असल्याने यानिमित्ताने बाजारात खरेदीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला गेला. यावेळी पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीवर देखील सकाळी बाजारात ग्राहकांनी गर्दी केली. कर, केळी तसेच खरबूज, आंबे, पूजेचे साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी झाले. यात खासकरून आंबे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. तसेच श्रीखंड, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खरेदीवर देखील अनेकांनी भर दिला. त्यामुळे बाजारात सकाळपासून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ३०० रुपये किलो पर्यंत आब्यांचा दर पोहोचला होता.

सोन्याच्या दागिने खरेदीला पसंती

सोन्या-चांदीच्या खरेदीला नेहमीप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला. सोन्याचे दर वाढले असले तरी ज्यांना गरज आहे त्यांना घ्यावेच लागते. फक्त घेण्याचे प्रमाण कमी केले जाते मात्र बाजारपेठेत खरेदीदारांची उत्साह कायम होता. सराफा बाजारात ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांसह नाण्यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ‘अक्षय्य तृतीयेला घेतलेले सोने अक्षय राहते’ या समजुतीमुळे दिवसभर सराफा गल्लीत ग्राहकांची वर्दळ कायम दिसून आली. बऱ्याच ठिकाणी सराफ्यांकडून ऑफर्स आणि सवलती देण्यात आल्या. त्यामुळे विक्रीत आणखी वाढ झाली. मध्यपूर्ण देशांमध्ये युद्धाचाय परिणामांचे ढग आता काहीसे कमी झाल्याचे यावरून दिसून आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारूच्या नशेत तरुणाचे स्वतःच्या हातावर 30 वार; कारण अस्पष्ट

अडीच ते तीन हजार टू व्हीलरची खरेदी

साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला अक्षयतृत्तिया या मुहूर्तावर अनेकांनी वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला. सध्या जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे देखील यंदा वाहन खरेदीत भर पडली. इतकेच नव्हे तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी टू व्हीलरच्या खरेदीत वाढ झाल्याने शोरूम धारकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. आजच्या अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर यंदा जवळपास अडीच हजार ते तीन हजार टू व्हीलरची खरेदी होण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. हा मुहूर्त साडेतीन मुहूतपैिकी एक असल्याने या दिवशी अनेकांनी नवीन वास्तूत प्रवेश करण्याचे नियोजन केले होते. तर अनेकांनी नवीन घर, फ्लॅट, दुकान खरेदीचा मुहूर्त साधला. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण दिसून आले. फ्लॅट, प्लॉट आणि दुकानांच्या खरेदीसाठी अनेकांनी या दिवसाचा मुहूर्त साधला. बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक योजना आणि सवलती जाहीर केल्याने बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली. काही प्रकल्पांमध्ये तर ऑन-द-स्पॉट बुकिंगही झाले.

इलेकट्रॉनिक खरेदीही जोमात, ग्राहकांचा प्रतिसाद

कापड बाजारात पारंपरिक वेशभूषा, साड्या आणि रेडिमेड कपड्यांच्या खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी दिसून आली, लग्नसराईच्या हंगामामुळेही विक्रीला चालना मिळाली, तसेच इलेक्ट्रॉनिक बाजारात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. विविध कंपन्यांच्या सवलती, एक्स्चेंज ऑफर्स आणि ईएमआय योजनांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला.

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड, जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !

Web Title: Chh sambhajinagar akshaya tritiya record turnover gold auto real estate market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • akshay tritiya
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
1

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी
2

Farmer Protest: सरकारची कर्जमाफी म्हणजे डोळ्यात धूळफेक… शेतकरी संघटना आक्रमक, शासन निर्णयाची केली होळी

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
3

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: पत्नीवर कुऱ्हाडीने तीन वार करत संपवलं; ‘मी बायकोला कायमचं संपवलं’ म्हणत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.