काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील तरुण हा आपल्या पत्नी आणि मुलासह बजाजनगर येथील एका सोसायटीत मागील 10 वर्षांपासून राहात आहे. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या काही काळापासून वाळूज परिसरात कामगार म्हणून काम करतो. सध्या त्याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने तो घरात एकटाच होता. असतानाच दारूच्या नशेत त्याने टोकाचे पाऊल उचलले. हातावर चाकूने ३० वार केल्यानंतर रात्रभर तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर त्याने शेजाऱ्यांकडे पाणी आणि मदत मागितली. नागरिकांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.
Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत
प्राथमिक उपचारानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मानसिक तणावामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हायकोर्ट वकिलाच्या हत्येमागे लुटारू टोळी; ‘तृतीयपंथी’ असल्याचा दावा खोटा?
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयातील वकील ॲड. मिथुन पुंडलिक भास्कर (वय 49) यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपी हा तृतीयपंथी असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता तो तृतीयपंथी नसल्याचं तृतीयपंथी समाजानेच स्पष्ट केलंय.
काय नेमकं प्रकरण?
बीड बायपास रोडवर गांधेली शिवारात बुधवारी रात्री ॲड. मिथुन भास्कर यांची हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली. सादिक अन्सारी (वय ४०) आणि नानासिंग हिरासिंग जुनी (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना सात दिवसांची (२३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी मिथुन यांच्या हत्येनंतर वॉलेट, मोबाईल लंपास केला असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
Ans: संभाजीनगरातील बजाजनगर परिसरात.
Ans: दारूच्या नशेत स्वतःच्या हातावर चाकूने 30 वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
Ans: रुग्णालयात उपचार सुरू असून तो सध्या जीवित आहे.






