Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर

Sambhajinagar Statue Work : छत्रपती संभाजीनगरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा २० नोव्हेंबरपर्यंत आणण्याचे आश्वासन देण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 17, 2026 | 04:03 PM
Ambedkar Statue to Be Installed at Bhadkal Gate by November 20 ( २० नोव्हेंबरपर्यंत भडकल गेट येथे आंबेडकरांचा पुतळा बसवला जाणार आहे.)

Ambedkar Statue to Be Installed at Bhadkal Gate by November 20 ( २० नोव्हेंबरपर्यंत भडकल गेट येथे आंबेडकरांचा पुतळा बसवला जाणार आहे.)

Follow Us
Follow Us:
  • पुतळ्यांच्या कामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला  
  • पुतळ्यांच्या कामांसाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या 
  • २० नोव्हेंबरपर्यंत पुतळा आणणार 
Sambhajinagar Statue Work :  छत्रपती संभाजीनगर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. भड़कलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच टीकी सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या कामांचा आयुक्तांनी दोन दिवसांत आढावा घ्यावा, असे आदेश महापौरांनी सर्वसाधारण सभेत दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा २० नोव्हेंबरपर्यंत आणण्याचे आश्वासन देण्यात आले असून तसेच टीकी सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या कामांचाही आढावा घेण्यात येणार आहे.

पुतळ्यांच्या कामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला

नगरसेवक अमित भुईगळ यांच्यासह अन्य नगरसेवकांनी पुतळ्यांच्या कामांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ७ डिसेंबरपूर्वी बसविण्यात यावा, अशी मागणी भुईगळ यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून न राहता महापालिकेने स्वतः लक्ष घालून ही कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, अशी भूमिकाही नगरसेवकांनी मांडली.

Sambhajinagar CCTV Rules : संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक ! ५० मीटर परिसरावर पोलिसांची नजर

पुतळ्यांच्या कामांसाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या

यावर उत्तर देताना महापौर राजूरकर यांनी सांगितले की, पुतळ्यांच्या कामांसाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, काम पूर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय कालमर्यादा (माइलस्टोन) निश्चित करण्यात आली आहे. या नियोजनानुसार प्रत्यक्ष काम सुरू आहे की नाही, याची तपासणी आयुक्तांनी दोन दिवसांत करावी. कामांमध्ये विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

२० नोव्हेंबरपर्यंत पुतळा आणणार

शहर अभियंता संजय कोंबडे यांनी सभागृहात कामाची माहिती दिली. भडकलगेट येथील पुतळ्याच्या परिसरातील सिव्हिल वर्क ९५ टक्के पूर्ण झाले असून, पुतळ्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर महापौरांनी महापालिकेमार्फत सुरू असलेले पुतळ्याचे काम पूर्ण करून २० नोव्हेंबरपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भडकलगेट येथे आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

Web Title: Chhatrapati sambhajinagar ambedkar statue bhadkal gate installation november 20 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

National Newborn Week 2026 : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम! संभाजीनगरात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात
1

National Newborn Week 2026 : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम! संभाजीनगरात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात

Sambhajinagar Crime News : पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ दिला अन् अत्याचार; खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
2

Sambhajinagar Crime News : पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ दिला अन् अत्याचार; खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात… डॉक्टरांनाही बसला! धक्का
3

Instagram Reels Addiction: ७५ वर्षीय आजीबाईंना जडले इन्स्टाग्राम रील्सचे वेड; मोबाईल काढताच रुग्णालयात… डॉक्टरांनाही बसला! धक्का

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
4

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.