Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद! अवघ्या ३ दिवसांत १० हजारांवर नोंदणी; ३,८०० कर्मचारी मैदानात

Chhatrapati Sambhajinagar Census 2027: छत्रपती संभाजीनगरमध्ये २०२७ च्या जनगणनेला सुरुवात झाली असून ३ दिवसांत १०,००० नागरिकांनी नोंदणी केली आहे. मोबाईल अॅप आणि पोर्टलद्वारे १५ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 03:02 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद! अवघ्या ३ दिवसांत १० हजारांवर नोंदणी; ३,८०० कर्मचारी मैदानात
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
  • अवघ्या ३ दिवसांत १० हजारांवर नोंदणी
  • ३,८०० कर्मचारी मैदानात
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जनगणना-२०२७ मोहिमेच्या प्रारंभीच संभाजीनगर शहरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. केवळ तीन दिवसांत १० हजारांहून अधिक नागरिकांनी स्वयं-नोंदणी करत सहभाग नोंदवला असून, त्यातील ७,६११ जणांनी आपली माहिती पूर्णपणे भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे. डिजिटल माध्यमातून जनगणनेला मिळालेला हा प्रतिसाद प्रशासनासाठी दिलासादायक मानला जात आहे.

महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांना मोबाईल अॅप आणि ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

१ मे रोजी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २,९८५ नागरिकांनी स्वयं-नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यापैकी २,१८२ जणांनी नोंदणी पूर्ण केली, तर उर्वरित प्रक्रिया सुरू होती. पुढील दोन दिवसांत सहभागात मोठी वाढ होऊन एकूण आकडा १०,०७९ वर पोहोचला. यामध्ये अद्याप २,४६८ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वयं-नोंदणीचा पहिला टप्पा १५ मेपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतर १६ मेपासून पुढील टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात नियुक्त कर्मचारी घराघरांत भेट देऊन नागरिकांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करतील. त्याचबरोबर प्रत्येक घराला स्वतंत्र क्रमांक देण्याचे कामही केले जाणार आहे.

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा

कामासाठी शहराचे १० ब्लॉक; आता नियोजनाला प्राधान्य

मोहिमेची अंमलबजावणी सुलभकरण्यासाठी शहराचे १० स्वतंत्र ब्लॉकमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक ब्लॉकमध्ये साधारण १२० ते १४० घरांचा समावेश असेल. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला निश्चित क्षेत्र मिळून कामाची गती आणि अचूकता दोन्ही साध्य होणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला महत्व आले आहे.

अचूक माहितीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

जनगणना प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी स्वयं-नोंदणी करताना अचूक माहिती भरावी, तसेच पडताळणीच्या वेळी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग हा या मोहिमेच्या यशाचा प्रमुख घटक ठरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

३, ८०० कर्मचारी सर्वेक्षणासाठी मैदानात

जनगणना मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची तयारी करण्यात आली आहे. समारे ३५०० सुमारे ३,५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ३,७०० ते ३,८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. फौजेत रिसता कहापालिका कर्मचारी आणि विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

Smart City Mission Handover: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात; ३० हून अधिक अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी

Web Title: Chhatrapati sambhajinagar census 2027 digital registration updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Census
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Digital Census

संबंधित बातम्या

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
1

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
2

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
3

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
4

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.