Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार; १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत १५ कोटींची अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा दाखल. ३६ मीटर उंचीचा वॉटर टॉवर आणि रोबोटमुळे उंच इमारतींमधील आग विझवणे होणार सुरक्षित.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 13, 2026 | 02:53 PM
अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार

अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार

Follow Us
Follow Us:

 

  • अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर!
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार
  • १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरात झपाट्याने वाढणाऱ्या बहुमजली इमारती आणि त्यासोबत वाढलेली अग्निसुरक्षेची जोखीम लक्षात घेता महानगरपालिकेने अग्निशमन सेवेत मोठी तांत्रिक झेप घेतली आहे. तब्बल ३६ मीटर उंचीचा मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर, उच्च क्षमतेचा बाउजर आणि रोबोटसह अत्याधुनिक संच शहरात दाखल झाला असून, यामुळे उंच इमारतींमधील आगीवर जलद, अचूक आणि सुरक्षित नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

पूर्वी उंच इमारतींमध्ये आग लागल्यास मर्यादित साधनांमुळे बचाव व नियंत्रणात अडचणी येत होत्या. अनेकदा अग्निशमन कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष आगीच्या ठिकाणी जावे लागत होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमार्फत १५.७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यातून ही अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यात आली.

जर्मन तंत्रज्ञानावर आधारित स्विंग कंपनीचा हा वॉटर टॉवर संच आधुनिक अग्निशमन व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. ३६ मीटरपर्यंत उंची गाठणारा हा टॉवर १० ते १२ मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर थेट आणि प्रभावी फवारा मारू शकतो. त्यावर बसविण्यात आलेले उच्च क्षमतेचे मॉनिटरिंग कॅमेरे, फायबर ऑप्टिक प्रणाली आणि थर्मल सेन्सरमुळे धूर, उष्णता आणि आगीचा अचूक ठाव घेणे शक्य होते. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रिमोट ऑपरेशन प्रणाली. कंट्रोल पॅनेलद्वारे ऑपरेटर तळमजल्यावरूनच संपूर्ण परिस्थितीचे निरीक्षण करून आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना थेट आगीजवळ जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

“डीजेच्या आवाजाने महापुरुषांची प्रतिमा उंचावत नाही”; जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिरसाट यांनी डीजेबंदीचे केले समर्थन

संचामधील १४ हजार लिटर क्षमतेचा वॉटर बाउजर सतत पाणीपुरवठा सुनिश्चित करतो, तर समाविष्ट अग्निशमन रोबोट अरुंद, धोकादायक किंवा मानवासाठी अवघड ठिकाणी जाऊन आग विझविण्याचे काम करतो. यामुळे संपूर्ण अग्निशमन प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि परिणामकारक बनणार आहे. महानगरपालिकेकडे ही यंत्रणा नुकतीच दाखल झाली असून, तिचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन यंत्रणेचा प्रत्यक्ष वापर सुरू केला जाणार आहे. अग्निशमन यंत्रणा नव्या तांत्रिक युगात प्रवेश करत आहे.

हायटेक अग्निशमन यंत्रणेची ठळक वैशिष्ट्ये

३६ मीटर उंचीपर्यंत पोहोचणारा वॉटर टॉवर, १४ हजार लिटर क्षमतेचा बाउजर आणि अग्निशमन रोबोट यांचा समावेश असलेला हा संच जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. थर्मल कॅमेरे व फायबर ऑप्टिक प्रणालीमुळे आगीचे अचूक निरीक्षण करता येते. रिमोट ऑपरेशनमुळे सुरक्षित अंतरावरून नियंत्रण मिळविता येते, तर उंच इमारतीमधील आगीवर जलद प्रतिसाद देण्याची क्षमता ही यंत्रणा प्रदान करते.

Chhatrapati Sambhajinagar: पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांना वेग; उपकेंद्रांची दुरुस्ती सुरू

Web Title: Chhatrapati sambhajinagar fire brigade high tech water tower robot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.