
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले 'बर्लिन'!
यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर समीर राजूरकर, महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह नगरसेवक शोभा बुरांडे, नवीन ओबेराय, शिल्पाराणी वाडकर, चंद्रकांत हिवराळे तसेच, सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा, माजी अध्यक्ष राम भोगले, मुकुंद भोगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष मुकुंद भोगले यांनी या बालोद्यानाची संकल्पना, त्यामागील प्रेरणा आणि प्रकल्प उभारणीतील विविध घटकांचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी! नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी; लवकरच शहराची तहान भागणार
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या, सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या आणि सामाजिक संवाद वाढविणाऱ्या जागांची शहरात आवश्यकता आहे. तर सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा यांनी, संस्थेकडून भविष्यात शहरात आणखी असे प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्रशांत देशपांडे, ज्योती दाशरथी, विवेक देशपांडे, मिलिंद केळकर, अजित सौन्दलगेकर, मप्रसाद कोकीळ, बाळकृष्ण भाकरे, शेख हबीब, आशिष गाडेकर, नताशा झरीन, प्रभंजन महातोळे, जगदीश एरांडे, हेमंत लांडगे, ललित जाधव, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, नंदकिशोर भोम्बे उपस्थित होते.
शहरात अशा प्रकारचे अत्याधुनिक व बालकेंद्री उद्यान विकसित झाल्याबद्दल मंत्री सावे यांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकल्पाच्या नियमित देखभालीवर भर देत, नागरिकांना दीर्घकाळ याचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर महापौर समीर राजूरकर यांनी, या बालोद्यानामुळे परिसरातील चिमुकल्यांना सुरक्षित, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात खेळण्याची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध केल्यासाठी त्यांनी सीएसएन फर्स्टचे विशेष आभार मानले. खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये सर्जनशीलता, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक मूल्यांची जपणूक होणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या पुढाकारातून अधिक परिणामकारक काम करता येत असल्याचे नमूद केले.