Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर! पारा ४० अंशांच्या पार; भाजीपाला महागला तर पशुधनासमोर चारा-पाण्याचं संकट

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने भाजीपाला महागला आहे. जाधववाडी भाजीमंडईत आवक घटली असून ग्रामीण भागात चारा व पाण्याचे संकट ओढवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 13, 2026 | 03:00 PM
भाजीपाल्याचे दर कडाडले, चाराही महागला (Photo Credit - X)

भाजीपाल्याचे दर कडाडले, चाराही महागला (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा कहर!
  • पारा ४० अंशांच्या पार
  • भाजीपाला महागला तर पशुधनासमोर चारा-पाण्याचं संकट
छत्रपती संभाजीनगर: मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. या तीव्र उष्णतेचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि ग्रामीण भागातील पशुधनावर झाला आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने भाजीपाल्याची आवक घटली असून, बाजारपेठेत दर गगनाला भिडले आहेत.

भाजीमंडईत आवक १०-१२ टक्क्यांनी घटली

तीव्र उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने भाजीपाल्याची पिके जळून खाक होत आहेत. परिणामी, शहरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी भाजीपाल्याची आवक १० ते १२ टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांच्या ताटातून भाजी आणि लिंबू गायब झाले आहे.

बाजारातील सध्याचे भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो):

  • भेंडी: १०० ते ११० रुपये
  • लसूण व लिंबू: २०० रुपये
  • हिरवी मिरची: १२० ते १४० रुपये
  • अद्रक: १०० रुपये
  • वांगी: ५० ते ६० रुपये
  • टोमॅटो व फ्लॉवर: ४५ ते ५० रुपये
  • कोथिंबीर/मेथी: २० ते ३० रुपये (एक जुडी)

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

पशुधनावर संकट: चारा आणि पाणी टंचाई गंभीर

ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्रतेमुळे हिरवा चारा नष्ट झाला आहे. वाळलेला चारा आणि मका कुट्टीचे दर प्रचंड वाढले असून, जालना जिल्ह्यासारख्या शेजारील भागातून चारा आणावा लागत आहे. ट्रॅक्टरने कडबा कुट्टी आणण्यासाठी शेतकऱ्यांना सुमारे साडेपाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही घट झाली आहे.

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता, जिल्हा उपआयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी पशुपालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:

  • जनावरांना दुपारच्या वेळी उन्हात बाहेर न सोडता थंड ठिकाणी बांधावे.
  • जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी द्यावे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी वैरणीसाठी नवीन बियाण्याची लागवड करावी.

विक्रेत्यांची व्यथा

वाढत्या महागाईमुळे किरकोळ बाजारात भाजीपाला विकणे कठीण झाले आहे. “उन्हामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत, पण ग्राहकांकडून दोन-पाच रुपये नफा कमावणेही आता अवघड झाले आहे,” अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेते संताजी सातपुते यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Web Title: Chhatrapati sambhajinagar heatwave vegetable prices hike fodder water crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Rates of Vegitables

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.