इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज उद्योगाला सर्वाधिक गॅस लागते. पावडर कोटिंग, पेंटिंग आणि सीईडी कोटिंग यासाठी गॅसची गरज भासते. एकूण ७५ टक्के उत्पादन प्रक्रियेत एलपीजी गॅसचा वापर केला जातो. गॅसपुरवठा बंद केल्याने उद्योगाला मोठी झळ बसणार आहे. सध्या शहरातील उद्योजकांकडे एक आठवड्याचा साठा शिल्लक आहे. मात्र त्यानंतर परिस्थिती चिंतनीय होणार आहे. यावर पर्यायाचा शोध घेतला जात आहे. यात विजेचा वापर केल्यास गॅसवरील अवलंबित्व कमी करता येऊ शकेल. या दृष्टीने उद्योजक कामाला लागले आहेत. मात्र यासाठी विशेष यंत्रणा उभारावी लागणार आहे. यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकता त. त्यामुळे शिल्लक साठा संपल्यानंतर उद्योजकांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता वर्तवली आहे. सीएमआयएचे पदाधिकारी मिहीर सौंदलगेकर म्हणाले की, युद्धाची अद्याप स्थिती स्पष्ट नाही. हे युद्ध किती दिवस सुरु राहू शकते यावर अवलंबून आहे.
आखाती देशांतील युद्धामुळे गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम दिसून येत आहे. पेट्रोलची कमतरता किंवा दरवाढ अटळ असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास पेट्रोलवर अवलंबून असलेल्या वाहनांसाठी त्रासदायक ठरणार आहे इव्ही वाहनांचा वापर केल्यास विजेचा पुरवठा आणि वाहन करण्याची क्षमता असलेल्या यंत्रणेची अपग्रेड करावी लागेल असे औद्योगिक सूत्रांचे म्हणणे आहे. उद्योगांना गॅस बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. आधी घरगुती वापरासाठी गॅस देणे महत्वाचे. त्यामुळे या निर्णयानुसार काम सुरु आहे. प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी
हे गॅस साठवण्यासाठी बुलेट उभारलेले असतात. शहरात उद्योगांसाठी किती किलो गॅसची गरज आहे याची ठोस माहिती नसली तरी एका पावडर कोटिंग करण्याऱ्या उद्योगाला रोज किमान दहा हजार किलो गॅस लागतो. यानुसार, शहराती उद्योगांना लाखो किलोंच्या घरात मागणी आहे. जमशेदपूर येथे चुनखडीतुन गॅसची निर्मिती करून तो गैस उद्योगांना वापरला जातो असेही बोलले जाते. मात्र संभाजीनगर येथे हा प्रयोग होण्याची चिन्हे नसल्याचे उद्योग सूत्रांनी म्हटले आहे.
युद्ध लवकर संपल्यास परिस्थिती आटोक्यात येऊ शकते मात्र युद्ध लांबल्यास उद्योजकांना पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी लागणार आहे. यात विजेचा पर्याय समोर येऊ शकतो. मात्र ही यंत्रणा उभारण्यासाठी कमीत कमी वेळ कसा लागू शकेल यावर विचार सुरु आहे. किमान दोन ते तीन आठवड्यात ही यंत्रणा उभारल्यास उद्योग सुरळीत सुरु राहू शकणार आहेत इतर पर्यायामध्ये तेलाच्या पर्यायाकडेही उद्योजक पाहत आहेत, मात्र परत तेलाचा तुटवडा भासल्यास अधकनी येऊ शकतील यष्टी विजेचा पर्याय हा कायमस्वरूपी टिकणारा आहे. त्यामुळे विजेकडे उद्योजकांचा अधिक ओढा आहे. सध्या शहरात बजाज उद्योगाला सर्वाधिक गॅसची गरज भासते यासोबतच सवरा, ऋचा इंडस्ट्री. एआयटीजी यांनाही गॅसची गरज भासते. पावडर कोटिंग करणाऱ्या उद्योगांना गॅस लागतो. यासर्वांची चिंता वाढली असुन पर्यायी मार्ग म्हणून विजेची चाचपणी केली जात आहे.






