Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड, पण पहिल्याच दिवशी वेबसाईट ‘क्रॅश’

छ. संभाजीनगर महानगरपालिकेची मालमत्ता कर वेबसाईट पहिल्याच दिवशी बंद. तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन कर भरणा रखडला. आता ६ एप्रिलपासून सेवा सुरू होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 04:25 PM
छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड (Photo Credit- Ai)

छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड (Photo Credit- Ai)

Follow Us
Follow Us:

 

  • छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ!
  • मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड
  • पण पहिल्याच दिवशी वेबसाईट ‘क्रॅश’
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मालमत्ता कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी ऑनलाइन भरणा करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेबसाईटच बंद पडल्याने करदात्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक कारणांचा दाखला देत प्रशासनाने काही दिवस सेवा बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेकडून दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना १० ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. यंदाही ही सवलत कायम ठेवण्यात आल्याने अनेक मालमत्ताधारकांनी १ एप्रिलपासूनच कर भरण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न केला.

परंतु ऑनलाइन अॅप आणि वेबसाईटवर लॉगिन करताच तांत्रिक अडथळे येऊ लागले. अनेकांनी वारंवार प्रयत्न करूनही साइट उघडत नसल्याने कर भरणा शक्य झाला नाही. परिणामी, सवलतीचा लाभमिळविण्यासाठी केलेली घाई नागरिकांसाठी त्रासदायक ठरली.

ऑनलाइन सेवा बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी बँक किंवा इतर माध्यमांतून कर भरण्याचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही आवश्यक प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. यामुळे करदात्यांनी महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला. सवलतीची घोषणा केली, पण त्यासाठी आवश्यक सुविधा मात्र उपलब्ध नाहीत, हा सर्वसामान्य नागरिकांना आस देण्याचा मनाचा डाव आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली.

स्मार्ट मीटरविरोधात ‘भाकप’चा एल्गार! नागरिकांच्या उदासीनतेमुळे सरकारची हिंमत वाढल्याचा आंदोलकांचा आरोप

साईट बंद ठेवण्यामागील नेमके खरे कारण काय?

महापालिकेच्या अधिका-यांच्या माहितीनुसार, ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन आर्थिक वर्षासाठी कराची मागणी (डिमांड) अद्ययावत करणे, तसेच तांत्रिक दुरुस्त्या करणे आवश्यक असते. या प्रक्रियेमुळेच वेबसाईट तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. त्यातच ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुटी आणि त्यानंतर शनिवार-रविवारची सुटी असल्याने ऑनलाइन सेवा थेट ६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सुरु झाल्यानंतर करा

पहिल्याच दिवशी कर भरण्याची घाई नागरिकांना महागात पडली असली, तरी सवलतीचा कालावधी अजून शिल्लक आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत टप्याटप्याने सवलत मिळणार असल्याने करदात्यांनी घाई न करता प्रणाली सुरळीत झाल्यानंतर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal property tax website down discount update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Property Tax

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
2

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
3

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.