Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी! नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी; लवकरच शहराची तहान भागणार

छत्रपती संभाजीनगरच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची पंपिंग आणि विद्युत यंत्रणेची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर करून ही तपासणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच शहराला नियमित पाणी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 22, 2026 | 01:31 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी!

छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी!

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी!
  • नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी
  • लवकरच शहराची तहान भागणार
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेने निर्णायक टप्पा गाठला आहे. योजनेअंतर्गत शुद्ध पाणी पंपिंग यंत्रणा, विद्युत उपकरणे तसेच उद्धरण वाहिनीच्या काही भागांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, शहराला लवकरच नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

या चाचण्यांसाठी यापूर्वी ९०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीमार्फत साठविण्यात आलेल्या सुमारे १६ दशलक्ष लिटर पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यात आला.  प्रथम उच्चस्तरीय मुख्य जलकुंभ(११ दशलक्ष लिटर क्षमता) याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्याच पाण्याचा उपयोग करून निम्नस्तरीय मुख्य जलकुंभ (५.५ दशलक्ष लिटर क्षमता) तपासण्यात आला. पुढे हे पाणी शुद्ध पाणी उपसा संपमध्ये वळवून त्या संपची कार्यक्षमता तपासण्यात आली. अखेरीस, याच पाण्याच्या साहाय्याने पंपिंग मशिनरी व उद्धरण वाहिनीची चाचणी पार पडली.

योजनेअंतर्गत उच्च व निम्नस्तरीय जलकुंभांसाठी एकूण १० शक्तिशाली पंप बसविण्यात आले आहेत. यामध्ये निम्नस्तरासाठी १२५० अश्वशक्ती क्षमतेचे (३ कार्यरत व २ राखीव) आणि उच्चस्तरासाठी ९३० अश्वशक्ती क्षमतेचे (३ कार्यरत व २ राखीव) पंपांचा समावेश आहे. या सर्व यंत्रणांनी चाचणीदरम्यान अपेक्षित कार्यक्षमता दाखवून दिली आहे. पंपिंग प्रणालीसाठी वापरण्यात आलेले पंप ‘विलो’ कंपनीचे असून, त्यासाठीच्या मोटर्स ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज’ या नामांकित कंपनीच्या आहेत. याशिवाय, प्रकल्पासाठी स्वतंत्र ३३/६.६ केव्ही क्षमतेचे व १५ एमव्हीए सामर्थ्यांचे विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले असून, त्याचीही चाचणी निर्विघ्न पार पडली आहे.

संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी मे. महावीर हायड्रो प्रोजेक्ट आणि मे. प्लुटो इलेक्ट्रोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा सक्षम असल्याचे सिद्ध झाल्यामुळे प्रशासनाने आता पुढील टप्प्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील उर्वरित किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच शहराकडे पाणी प्रवाहित करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा, एमआयएम प्रदेशाध्यक्ष जलील यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून वाद

असा चाचण्यांचा टप्याटप्याने प्रवास

  • १६ दशलक्ष लिटर पाण्याचा प्रभावी वापर
  • उच्चस्तरीय जलकुंभ (११ दशलक्ष लिटर) चाचणी पूर्ण
  • निम्नस्तरीय जलकुंभ (५.५ दशलक्ष लिटर) तपासणी
  • उपसा संप व पंपिग यंत्रणेची कार्यक्षमता पडताळणी
  • उद्धरण वाहिनीची यशस्वी चाचणी

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • एकूण १० उच्च क्षमतेचे पंप कार्यरत
  • १२५० व ९३० अश्वशक्ती क्षमतेची यंत्रणा
  • ३३/६.६ केव्ही व १५ एमव्हीएचे स्वतंत्र उपकेंद्र
  • दर्जेदार पंप व मोटर्सचा वापर
  • अंतिम टप्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू
Chhatrapati Sambhajinagar: रॉकेलचे दर ठरले, पण ग्राहकांमध्ये संताप! ६३ रुपयांच्या दरामुळे रेशनकार्डधारकांचा खिसा रिकामा होणार

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply scheme pumping test success update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
3

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.